Hathras Stampede sakal
देश

Hathras Stampede : सर्वोच्च न्यायालयात शुक्रवारी सुनावणी

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेसंदर्भात येत्या शुक्रवारी सुनावणी घेतली जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाकडून सांगण्यात आले आहे. याबाबतची जनहित याचिका सूचीबद्ध करण्याचे निर्देश सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी दिले आहेत. हाथरस येथे चेंगराचेंगरीत १२१ लोकांचा मृत्यू झाला होता.

या प्रकरणाच्या चौकशीसाठी उत्तर प्रदेश सरकारने एसआयटी स्थापन केली होती. एसआयटीने अहवाल सरकारला सोपविला आहे. चेंगराचेंगरीच्या प्रकरणाची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशामार्फत चौकशी करण्याचे निर्देश द्यावेत, अशा विनंतीची याचिका ॲड. विशाल तिवारी यांनी दाखल केली आहे. हाथरस घटना अक्षम्य दुर्लक्षामुळे झाली असून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना करणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर माजी न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली पाच तज्ज्ञांची समिती नेमावी. गर्दीच्या ठिकाणी दुर्घटना टाळण्यासाठी आवश्यक ती मार्गदर्शक तत्त्वे आखून देण्यास या समितीला सांगितले जावे, असे तिवारी यांनी जनहित याचिकेत म्हटले आहे.

दिल्लीत जंतरमंतरवर निदर्शने

नवी दिल्लीः हाथरस येथे झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणी स्वयंघोषित बाबा सुरजपाल ऊर्फ नारायण साकार याच्याविरोधात कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे येथील जंतर-मंतर येथे निदर्शने करण्यात आली. ‘‘इतकी मोठी दुर्घटना होऊनही सुरजपाल याच्याविरोधात कोणतीही कारवाई करण्यात आली नाही,’’ असा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींचे टपालात दीड लाख खाती; जिल्हाभरातील महिलांची पसंती

IND vs NZ, Test: जड्डू मानलं तुला! किवींच्या दोन फलंदाजांचे उडवले त्रिफळे, भारताचे दमदार पुनरागमन

Model Code Of Conduct: विधानसभेचा धुरळा... आचारसंहितेत काय करता येते अन् काय नाही? जाणून घ्या एका क्लिकवर

Ratan Tata: कोणाला मिळणार 7,900 कोटी रुपये? रतन टाटांच्या मृत्यूपत्राची अंमलबजावणी कोण करणार?

Rishabh Pant कसोटी मालिकेला मुकण्याची चिन्ह; तिसऱ्या दिवशी मैदानावर नाही आला, BCCI ने दिले अपडेट्स

SCROLL FOR NEXT