supreme court  
देश

Supreme Court : सनातन धर्मावरील वक्तव्याप्रकरणी मद्रास उच्च न्यायालयाचे वकील सर्वोच्च न्यायालयात, पण...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली - मद्रास उच्च न्यायालयाच्या वकिलांनी सनातन धर्मावरील वक्तव्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली असून स्टॅलिन आणि इतरांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची मागणी केली आहे.

याशिवाय स्टॅलिन यांनी यापुढे कोणतीही प्रतिक्रिया देऊ नये, अशा सूचनाही देण्याचीही मागणी केली आहे. सनातन धर्माविरोधातील सर्व सभांवर बंदी घालण्याची मागणी करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांनी धर्माविरुद्ध बोलण्यासाठी महाविद्यालयांमध्ये सभा आयोजित करण्याच्या सर्व "प्रस्तावित योजनांवर" बंदी घालण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे.

सध्या सर्वोच्च न्यायालयाने त्यावर तातडीने सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. चंद्रचूड यांनी लवकर सुनावणीसाठी ई-मेल करण्याच्या सूचना केल्या आहेत.

याआधी तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि खासदार ए राजा यांनी सनातन धर्मावर केलेल्या टिप्पणीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले होते. उदयनिधी स्टॅलिन आणि खासदार ए राजा यांच्यावर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली आणि चेन्नईच्या पोलीस आयुक्तांवरही अवमानाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. वकील विनीत जिंदाल यांनी सनातन धर्माविरोधात द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Soneri Bhog Sweet: 24 कॅरेट सोन्याचा वापर; महाराष्ट्रात 'सोनेरी भोग' मिठाई आकर्षणाचे केंद्र, किंमत ऐकून व्हाल थक्क

Pakistan Cricket: पाकिस्तानने नवा ODI-T20I कॅप्टन केला जाहीर; 'हा' खेळाडू घेणार बाबर आझमची जागा

Pranav Pandey: क्रिकेटरच्या पप्पांचा JDU मध्ये प्रवेश; वडिलांचे नाव प्रणव पांडे, पण इशान आडनाव 'किशन' असं का लिहितो?

त्या फॅनने केक भरवताच...श्रद्धाच्या कृतीने नेटकरी भारावले ; व्हिडीओ झाला व्हायरल

Jaishankar on Terror Attack : 26/11 च्या मुंबई हल्ल्याला भारताने प्रत्युत्तर दिलं नाही, पण...; एस जयशंकर यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT