नवी दिल्ली : सुप्रीम कोर्टाचं कामकाज मंगळवारी पहिल्यांदा लाईव्ह ट्रान्सक्राईब अर्थात लिखित स्वरुपात दाखवण्यात आलं. कृत्रिम बुद्धिमत्ता (Artificial Intelliagence) आणि नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग टेक्नॉलॉजीच्या मदतीनं हे लाईव्ह ट्रान्सक्रिप्शन करण्यात आलं.
या योजनेच्या माध्यमातून कोर्टाचं प्रोसेडिंग आवाज आणि टेक्स्टच्या स्वरुपात स्क्रीनवर दाखवण्यात आलं. यामुळं कोर्टाचं कामकाज आता लाईव्ह वाचता येणार आहे. ज्या लोकांना कमी ऐकू येतं किंवा ऐकण्यात अडचण येते, त्यांना याचा मोठा फायदा मिळेल. (Supreme Court proceedings can now be read live Beginning from today)
सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांनी लाईव्ह ट्रान्स्क्रिप्शन मंगळवारी कोर्टात लॉन्च केलं. राज्यातील सत्तासंघर्षावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठानं ट्रान्सक्राईब केलं होतं. यानंतर वकील याची तपासणी करतील त्यानंतर सर्वकाही ठीकठाक असल्याचं दिसून आल्यानंतर त्याला सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर अपलोड करण्यात येणार आहे. सरन्यायाधीशांनी म्हटलं की, आता हे प्रायोगित तत्वावर करण्यात येत आहे. सर्वकाही योग्य प्रकारे होऊ लागल्यानंतर याला कायमस्वरुपी लागू करण्यात येईल.
गेल्यावर्षी सप्टेंबरमध्ये सुप्रीम कोर्टाचं कामकाज लाईव्ह टेलिकास्ट करण्याची सुरुवात करण्यात आली होती. ज्याअंतर्गत सुप्रीम कोर्टाच्या वेबसाईटवर कोर्टाचं कामकाज लाईव्ह पाहता येतं. आता कारवाई पाहणं आणि ऐकण्याबरोबर ते वाचताही येऊ शकतं.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.