Arvind kejriwal Esakal
देश

Arvind Kejriwal's plea: अरविंद केजरीवाल यांना सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाहीच, 2 जूनला करावं लागणार आत्मसमर्पण

Extension of his interim bail :दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला ७ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्लीः दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अंतरिम जामिनाला ७ दिवसांची मुदतवाढ देण्याची मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली आहे. केजरीवाल यांना आता 2 जून रोजी आत्मसमर्पण करावे लागणार आहे.

मुख्यमंत्र्यांना नियमित जामीनासाठी ट्रायल कोर्टात जाण्याचे स्वातंत्र्य दिलेले असल्याने ही याचिका सुप्रीम कोर्टात राखता येणार नाही ,अस सांगत सुप्रीम कोर्टाच्या रजिस्ट्रीने अर्ज स्वीकारण्यास नकार दिला आहे.

दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी अरविंद केजरीवाल हे तुरुंगात होते. त्यांना कोर्टाने जामीन दिला. १ जूनला त्यांच्या जामिनाची मुदत संपणार आहे. त्यामुळे अरविंद केजरीवाल यांनी प्रकृतीच्या कारणास्तव सात दिवसांची अधिकची वेळ सुप्रीम कोर्टाकडे मागितली होती. पण, सुप्रीम कोर्टाने याप्रकरणी तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला आहे. त्यामुळे ते १ जूननंतर पुन्हा तुरुंगात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

केजरीवाल यांनी आपल्या विनंती याचिकेत म्हटलं होतं की, 'माझ्या वजनामध्ये मोठी घट झाली असून माझे आरोग्य ठीक नाही. त्यामुळे मला आणखी सात दिवसांची सुट देण्यात यावी. जेणेकरुन मला आवश्यक उपचार घेता येतील.' मंगळवारी कोर्टाने अरविंद केजरीवाल यांच्या जामिनाच्या याचिकेवर तात्काळ सुनावणी घेण्यास नकार दिला होता. जामिनाचा चेंडू सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या कोर्टात गेला होता.

कोर्टाने १० मे रोजी अरविंद केजरीवाल यांना जामीन दिला होता. लोकसभा निवडणुकीचा प्रचार करता यावा यासाठी अपवाद म्हणून सरन्यायाधीशांनी हा निर्णय घेतला होता. तसेच १ तारखेला निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर आत्मसमर्पन करण्यास सांगितले होते. केजरीवाल यांना सक्तवसुली संचालनालयाने मद्य घोटाळ्याप्रकरणात २१ मार्च रोजी अटक केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे नाही; शरद पवारांचा 'खास'माणूस मुख्यमंत्री होणार? राऊतांनी थेट नावच सांगितलं!

म्हणून तुझ्यासोबत कुणी काम करत नाही... अनिल कपूर यांचं नाना पाटेकरांबद्दल थेट वक्तव्य ; म्हणाले- सगळ्यांना मारून

Sambhajinagar: इम्तियाज जलीलांवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल; मतदानाच्या दिवशी झाला होता वाद

Imtiaz Jaleel : बूथ कॅप्चर भाजपने केले अन् गुन्हा माझ्यावर कसा? इम्तियाज जलील

AUS vs IND 1st Test: भारतीय फलंदाजी ऑस्ट्रेलियन वेगवान माऱ्यासमोर कोलमडली! कसाबसा गाठला १५० धावांचा टप्पा

SCROLL FOR NEXT