Supreme Court Order On Child Porn esakal
देश

Supreme Court: चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणे गुन्हा, मग कोणी व्हॉट्सॲपवर पाठवलं तर? सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णय काय सांगतो?

रोहित कणसे

सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी लहान मुलांशी संबंधीत पॉर्नोग्राफी पाहणे आणि आपल्या फोनमध्ये किंवा लॅपटॉपमध्ये स्टोअर करण्याबद्दल ऐतिहासिक निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, तुम्चाय फोनमध्ये जर चाइल्ड पॉर्न असेल तर तुम्ही लगेच गुन्हेगार ठरणार नही. पण जर कोणी चाइल्ड पॉर्न फॉरवर्ड केले असेल आणि तुम्ही ते डाऊनलोड केले किंवा पाहिले तर तुम्ही गुन्ह्याच्या कक्षेत याल.

कोर्टाने स्पष्ट केले की चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणे आणि ते पाहाणे हे पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्ह्याच्या श्रेणीमध्ये येते.

नेमकं हे प्रकरण काय आहे?

हाय कोर्टाच्या निर्णयात न्यायाधीश एन आनंद व्यंकटेश यांनी म्हटले होते खी कोणत्या वयक्तिक इलेक्ट्रॉनिक डिव्हाइसवर चाइल्ड पॉर्नोग्राफी डाऊनलोड करणे किंवा ती पाहाणे पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा नाही.

उच्च न्यायालयाना हरीश नावाच्या व्यक्तीविरोधात सुरू असलेली कारवाई रद्द करत ही टिप्पणी करण्यात आली होती. हरीष याच्या विरोधात त्याच्या मोबाईलवर दोन चाइल्ड पॉर्नोग्राफी व्हिडीओ डाऊनलोड करून ते पाहल्यावरून पॉक्सो कायदा आणि आयटी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता.

मार्च महिन्यात या प्रकरणात सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने हायकोर्टाची ही टिप्पणी "घृणास्पद" होते असे म्हटले.

केरळ उच्च न्यायालयाने काही दिवसांपूप्वी चाइल्ड पॉर्नोग्राफी एक्सीडेंटली डाउनलोड करणे किंवा आपल्या मर्जीने डाऊनलोड करणे इंफोर्मेशन टेक्नोलॉजी कायद्याअंतर्गत गुन्हा नसल्याचे म्हटले आहे.

२०२२ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने ब्युरो ऑफ पोलिस रिसर्च अँड डेव्हलपमेंट (BPRD) ला पॉर्नोग्रापी पाहणे आणि लैंगिक गुन्ह्यांमध्ये संबंधांचा खुलासा करण्यासाठी डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर विचार करण्यास नकार दिला होता.

भारतात पॉक्सो अधिनियम २०१२ आणि आयटी अधिनियम २००० इतर कायद्याअंतर्गत चाइल्ड पॉर्नोग्राफी तयार करणे, वितरीत करणे आणि ताब्यात असणे याला गुन्हा जाहीर करण्यात आले आहे.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात हे देखील सांगितले आहे की आथा न्यायालयांनी चाइल्ड पॉर्नोग्राफी हा शब्द वापरून नये.

सर्वोच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात म्हटले आहे की जर एखाद्या व्यक्तीने तुम्हाला सोशल मीडियावर चाइल्ड पॉर्न संबंधीत कंटेंट पाठवला असेल तर तो गुन्हा ठरत नाही, पण जर तुम्ही तो पाहिला किंवा इतरांना पाठवला तर ती कृती गुन्ह्याच्या कक्षेत येते. पण फक्त तुम्हाला कोणीतरी असा व्हिडीओ पाठवला म्हणून तुम्ही गुन्हेगार ठरत नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Badlapur Case: अक्षय शिंदेनं पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर झाडली गोळी; आत्महत्येचा केला प्रयत्न

BMC New Advertisement: मुंबई महापालिकेच्या 1,846 लिपिकपदांसाठी निघाली नवी जाहिरात; 'ती' अट झाली रद्द

Irani Cup 2024: अजिंक्य रहाणेकडे कर्णधारपदाची जबाबदारी; शार्दुल ठाकूर, श्रेयस अय्यरलाही मिळणार संघात संधी

Israel-Hezbollah Conflict: इस्त्रायलचा लेबनॉनवर मोठा हल्ला, सुमारे 50 लोक ठार, 300 हून अधिक जण जखमी

Girish Mahajan: फर्दापूरचं रेस्ट हाऊस अन् दारुचा बॉक्स; खडसे-महाजन भांडणाचं कारण आलं समोर! गोपीनाथ मुंडेंना करावी लागली होती मध्यस्थी

SCROLL FOR NEXT