भारत-नेपाळ सीमेवरून उत्तर प्रदेशात बेकायदेशीरपणे प्रवेश केलेल्या एका चिनी नागरिकाला हेरगिरीत गुंतल्याच्या संशयावरून अटक करण्यात आली आहे.
राज्यात बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी सिद्धार्थनगर पोलिसांनी यू फेनघाओ (४६) याला १० मे रोजी अटक केली होती. त्याच्या मोबाइल फोनच्या फॉरेन्सिक तपासणीत हेरगिरीच्या कारवायांमध्ये त्याचा संभाव्य सहभाग उघड झाला आहे. (Suspected Chinese Man Arrested for Espionage)
एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खुलासा केला की, आरोपीच्या मोबाईल फोनवरून मिळालेल्या डेटावरून त्याचे चिनी सैन्याशी संबंध असल्याचे समोर आले आहे. त्यामध्ये भारतीय लष्कराच्या अनेक तुकड्यांची छायाचित्रे आणि भारताच्या शत्रू राष्ट्रांना भेटी दिल्याचे पुरावेही समोर आले आहेत, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने दिले आहे.
सिद्धार्थनगरच्या पोलिस अधीक्षक प्राची सिंग यांनी सांगितले की, प्राथमिक चौकशी आणि पुराव्यांवरुन असे समोर येते की, यू फेंगाओचा हेरगिरीमध्ये सहभाग आहे.
प्राची सिंग पुढे म्हणाल्या, "आम्ही इंटेलिजन्स ब्युरो (IB) आणि उत्तर प्रदेश पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना या घटनेबद्दल माहिती दिली आहे."
या प्रकरणाचा तपास करणाऱ्या आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, यू फेंगाओने पाकिस्तानसह भारताच्या अनेक शत्रू राष्ट्रांना भेटी दिल्या आहेत. तसेच त्याने त्याच्या मोबाईलमध्ये भारतीय लष्कराच्या प्रतिष्ठानांचे अनेक फोटो काढून डिलिट केले त्यामुळे तो संशयित ठरला. याशिवाय आरोपीने चौकशीदरम्यान सहकार्य न केल्याने हा संशय बळावला, असेही ते म्हणाले.
यू फेंगाओचे भारतात काही संपर्क आहेत की नाही हे शोधण्यासाठी पोलीस त्याच्या कॉल डिटेल्सचे विश्लेषण करत आहेत. तसेच सांभाव्य 'हवाला लिंक्स'साठी त्याच्या बँक खात्यांचीही चौकशी सुरू आहे.
10 मे रोजी, हरिवंशपूर सीमा चौकीच्या लीलादिहवा येथील पोलीस आणि SSB कर्मचाऱ्यांना एक व्यक्ती भारताच्या दिशेने सायकल चालवत परदेशी भाषेत संभाषण करत येत असल्याची माहिती मिळाली होती.
चौकीपाशी आल्यानंतर पोलिसांनी सायकलीवर येत असलेल्या या व्यक्तीला थांबवत त्याच्या ओळखपत्रांची मागणी केली.
यावर यू फेंगाओ म्हणाला की, तो चीनचा आहे आणि मोबाइल भाषांतर वापरत आहे. तो तीन दिवसांपासून नेपाळमध्ये असून पर्यटनासाठी भारतात आलो आहे.
मात्र, यू फेंगाओ त्याची ओळखपत्रे दाखवू शकला नाही. त्यानंतर पोलिसांनी या व्यक्तीला ताब्यात घेत त्याच्याकडून चिनी युआन आणि अमेरिकन डॉलर जप्त केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.