Swachh Bharat mission big people movement Statement of Prime Minister Narendra Modi sakal
देश

Swachh Bharat Mission : ‘स्वच्छ भारत’ मोठी लोकचळवळ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिपादन

स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्षे झाल्यानिमित्त विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : ‘‘स्वच्छ भारत अभियान ही २१ शतकातील यशस्वी ठरलेली सर्वांत मोठी लोकचळवळ होती, या चळवळीचा थेट परिणाम हा सार्वजनिक आरोग्यावर आणि समृद्धतेवर झाला,’’ असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी केले. स्वच्छ भारत अभियानाला दहा वर्षे झाल्यानिमित्त विज्ञान भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.

‘‘तुम्ही सर्व देशवासीयांनी ही चळवळ यशस्वी करून दाखवली. देशात आयोजित करण्यात आलेल्या सेवा पंधरवड्यामध्ये अवघ्या पंधरा दिवसांत देशभरात स्वच्छतेशी निगडित कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात २८ कोटी नागरिकांनी सहभाग नोंदविला होता,’’ असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

लोकांनी मोठ्याप्रमाणात या चळवळीत सहभाग घेत या चळवळीचे रूपांतर देशाच्या समृद्धीच्या नव्या मार्गात झाले, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केले. देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री, मंत्री आणि सरकारच्या सर्व प्रतिनिधींनी या अभियानामध्ये महत्त्वपूर्ण भूमिका निभावली असून आपण सर्वांनी सातत्याने केलेले प्रयत्न हे स्वच्छ भारताचे स्वप्न साकारणारे होऊ शकतील, असे ते म्हणाले.

काँग्रेसवर टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी बोलताना काँग्रेसच्या सत्ताकाळातील सरकारवर टीका केली. ‘‘आधीच्या सरकारांनी मूलभूत स्वच्छतेकडे दुर्लक्ष केले. अस्वच्छता आणि शौचालयांचा अभाव हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा विषय नव्हता,’’ असे ते म्हणाले.

विकासकामांचे उद्‍घाटन

पंतप्रधान मोदी यांनी या कार्यक्रमादरम्यान स्वच्छ भारत अभियान आणि अमृत २.० योजनेअंतर्गत सुमारे दहा हजार कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्‍घाटन केले. यामध्ये सांडपाण्यावर प्रक्रिया करणारे प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प यांसह विविध प्रकल्पांचा समावेश आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले...

  • सर्वसामान्य माणसांचे जीवन सुखकर करणे हे पंतप्रधानाचे कर्तव्य आहे

  • एनडीए सरकारच्या आधीच्या काळात सुमारे ६० टक्के नागरिकांना उघड्यावर शौचासाठी जावे लागत होते; हा मागासवर्गीय, दलित आणि आदिवासींचा एकप्रकारे अपमानच होता.

  • एका आंतरराष्ट्रीय अहवालानुसार स्वच्छ भारत अभियानामुळे दरवर्षी ६० ते ७० हजार बालकांचे जीव वाचत आहेत

  • घरात किंवा घराजवळ स्वच्छतागृहे बांधल्यामुळे ‘युनिसेफ’च्या एका सर्वेक्षणानुसार देशातील ९० टक्के महिलांना सुरक्षित वाटत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT