Swati Maliwal esakal
देश

Swati Maliwal: स्वाती मालीवाल यांचा आणखी एक Video समोर, सुरक्षा कर्मचाऱ्यांनी हात धरून नेले, अन्....

Sandip Kapde

Swati Maliwal: 

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या निवासस्थानी आम आदमी पक्षाच्या (आप) राज्यसभा खासदार स्वाती मालीवाल यांच्यावर झालेल्या कथित हल्ल्यावरून दिल्लीपासून देशभरात राजकारण तापले आहे. स्वाती मालीवाल यांच्या वक्तव्याच्या आधारे दिल्ली पोलिसांनी गुरुवारी या संदर्भात केजरीवाल यांचे पीए बिभव कुमार यांच्या विरोधात एफआयआर नोंदवला आहे.

दिल्लीच्या सिव्हिल लाइन्स पोलिस स्टेशनमध्ये भारतीय दंड संहितेच्या कलम 354, 506, 509 आणि 323 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, याशिवाय इतर कलमांनुसार महिलेवर तिचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हल्ला करणे किंवा गुन्हेगारी बळाचा वापर करणे, गुन्हेगारी धमकी देणे, धमकावणे यासह इतर कलमांचा समावेश आहे. दरम्यान स्वाती मालीवालचा यांचा दुसरा व्हिडिओ समोर आला आहे.

हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाचा असून १३ मेचा आहे. या सीसीटीव्ही व्हिडिओमध्ये स्वाती मालीवाल सीएम हाउसमधून वेगाने बाहेर येताना दिसत आहे आणि एक महिला सुरक्षा कर्मचारी त्यांचा हात धरून त्यांना बाहेर काढत आहेत. यावेळी आणखी तीन सुरक्षा कर्मचारीही दिसत आहेत.

स्वाती मालीवाल रस्त्यावर येताच त्यांनी महिला सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या हातातून आपला हात झटकला आहे. यादरम्यान तेथे दोन पोलिसही दिसतात आणि स्वाती मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाकडे बोट दाखवत त्यांना काहीतरी बोलते. दरम्यान स्वातीने आरोप केला आहे की लोक घरातील सीसीटीव्हीशी छेडछाड करत आहेत.

आम आदमी पार्टीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये कोणतेही कपडे फाटलेले नाही. तसेच ते चालत देखील व्यवस्थीत आहेत. त्यांना कुठे जखमही दिसत नाही आहे. हा व्हिडिओ स्वाती मालीवाल यांचा खरेपणा जगासमोर आणेल.

दिल्ली सरकारचे मंत्री आतिशी यांनी आरोप केला केली स्वाती मालीवाल काही दिवसांपासून भाजपच्या संपर्कात आहेत. भाजपच्या सांगण्यावरुन त्यांनी हे सर्व केलं आहे. भाजप अरविंद केजरीवाल यांना फसवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजप केजरीवाल यांना फसवण्यासाठी षडयंत्र रचत असून याचा चेहरा स्वाती मालीवाल आहेत.

स्वाती मालीवाल म्हणाली, दरवेळेप्रमाणेच यावेळीही या राजकीय हिटमॅनने स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आपल्या लोकांना ट्विट करायला लावून, आणि कोणत्याही संदर्भाशिवाय व्हिडिओ प्ले करून, तो हा गुन्हा करण्यापासून स्वतःला वाचवेल असे वाटते. कोणी कोणाला मारहाण करताना व्हिडिओ बनवतो का? घर आणि खोलीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता सत्य सर्वांसमोर येईल. देव सर्व काही पाहत आहे. एक ना एक दिवस सत्य जगासमोर येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai University Senate Election Result: सिनेट निवडणुकीत युवासेनेचे पाचही उमेदवार विजयी, खुल्या वर्गातील उमेदवारांची मतमोजणी सुरू

Param Rudra Supercomputers : PM मोदींनी लॉन्च केलेले सुपर कॉम्प्युटर्स का आहेत खास? जाणून घ्या सर्वकाही

Health Department Scam: स्वच्छतेच्या नावाखाली आरोग्य विभागाचा 3,200 कोटींचा घोटाळा? वडेट्टीवारांनी सादर केली कागदपत्रं

Kamindu Mendis ने मोडला कांबळीचा २० वर्षे जुना विक्रम! 'असा' पराक्रम करणारा पहिलाच आशियाई, तर ब्रॅडमन यांच्याशीही बरोबरी

Ott Release This Week: स्त्री 2 ते ताजा खबर, या आठवड्यात ओटीटीवर पाहा या नवीन कलाकृती

SCROLL FOR NEXT