Swati Maliwal Assault Case sakal
देश

Swati Maliwal Assault Case : मालिवालप्रकरणी महिला आयोग सक्रिय;केजरीवालांच्या सचिवांना समन्स, पोलिसांकडूनही मागविला अहवाल

राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तन प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : राज्यसभेच्या खासदार स्वाती मालिवाल यांच्याशी झालेल्या गैरवर्तन प्रकरणाने आता वेगळे वळण घेतले आहे. या प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून दखल घेतली असून मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार यांना उद्यापर्यंत (ता. १७) हजर राहण्याचे समन्स बजावले आहे, तसेच दिल्ली पोलिसांकडूनही आतापर्यंत झालेल्या कार्यवाहीचा अहवालही मागविला आहे.

दिल्लीतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी खासदार स्वाती मालिवाल यांच्यावर हल्ला केल्याचा विभवकुमार यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आम आदमी पक्षानेही स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याचे मान्य केले आहे. केजरीवाल यांनी या प्रकरणाची नोंद घेतली असून कठोर कारवाई केली जाईल, असे खासदार संजय सिंह यांनी स्पष्ट केले असले तरी अद्याप गुन्हा नोंदविण्यात आलेला नसल्याने भाजपने आप आणि केजरीवाल यांना लक्ष्य केले आहे.

आता राष्ट्रीय महिला आयोगाने स्वतःहून या प्रकरणाची दखल घेऊन विभवकुमार यांना शुक्रवारी सकाळी अकरा वाजेपर्यंत आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. तसेच या संपूर्ण घटनाक्रमात झालेल्या कार्यवाहीबाबत आयोगाने दिल्ली पोलिसांनाही पत्र लिहून माहिती मागविली आहे. आयोगाने दिल्ली पोलिस आयुक्त संजय अरोरा यांना यासंदर्भात १३ मे रोजी पत्र पाठविले होते.

‘एफआयआर’ दाखल

स्वाती मालिवाल यांना झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांनी ‘एफआयआर’ दाखल केला आहे. या ‘एफआयआर’मध्ये आरोपी म्हणून दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सहायक विभवकुमार याचे नाव घेण्यात आले आहे.

भाजपचा हल्लाबोल

उत्तर प्रदेश दौऱ्यावर गेलेले अरविंद केजरीवाल यांच्या समवेत विभवकुमार हेदेखील लखनौ विमानतळावर दिसले. यानंतर भाजपकडून पुन्हा एकदा ‘आप’ व केजरीवाल यांच्यावर शाब्दीक हल्ला करण्यात आला. भाजपचे प्रवक्ते शहजाद पुनावाला म्हणाले, ‘‘राज्यसभेच्या महिला खासदारांशी मुख्यमंत्र्यांच्या समोर गैरवर्तन झाले आणि ७२ तास उलटून काहीही कारवाई झालेली नाही. महिलांवरील अत्याचारांबद्दल पोटतिडकीने बोलणाऱ्या स्वाती मालिवालदेखील गप्प आहेत. केजरीवाल यांच्या सांगण्यावरूनच स्वाती मालिवाल यांच्याशी गैरवर्तन झाल्याचे यातून स्पष्ट झाले आहे.’’

इतरही विषय महत्त्वाचे

लखनौ : प्रचारासाठी उत्तर प्रदेशात आलेले ‘आप’चे नेते अरविंद केजरीवाल यांनी आज ‘सप’चे प्रमुख अखिलेश यादव यांच्यासह संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी पत्रकारांनी मालिवाल हल्लाप्रकरणी प्रश्‍न विचारला असता केजरीवाल यांनी उत्तर देणे टाळले. चर्चा करण्यासाठी इतर अनेक महत्त्वाचे प्रश्‍न आहेत, असे म्हणत अखिलेश यांनीही प्रश्‍नाला बगल दिली. या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेले ‘आप’चे नेते संजय सिंह म्हणाले,‘‘या प्रश्‍नावर राजकारण केले जाऊ नये. आम्हाला प्रश्‍न विचारणाऱ्या भाजपने आधी मणिपूरमध्ये महिलांवर झालेल्या अत्याचारावर उत्तर द्यावे, प्रज्वल रेवण्णा यांच्याबाबत उत्तर द्यावे आणि कुस्तीगीरांच्या आंदोलनावेळी मालिवाल यांना मारहाण झाली होती, त्यावर उत्तर द्यावे. भाजप ही एक टोळी असून ती इतरांविरोधात खोट्या तक्रारी दाखल करते,’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: राज ठाकरेंची मोठी खेळी! मावळमध्ये अजित पवारांची कोंडी, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा जाहीर

Shahu Chhatrapati: मधुरिमाराजेंनी उमेदवारी मागे का घेतली? शाहू छत्रपतींनी स्पष्टच सांगितले, म्हणाले...

Sports Bulletin 5th November: भारत-पाकिस्तानचे खेळाडू एकाच संघातून खेळणार ते २०३६ च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारताचे पत्र

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Latest Marathi News Updates live : पुण्यातील नवले पुलावर 2 वाहनांचा अपघात, 3 जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT