देश

Swati Maliwal News : दिल्लीच्या राजकारणात भूकंप! कुठे आहेत स्वाती मालीवाल? मारहाणीच्या मुद्द्यावरुन भाजपने 'आप'ला घेरलं

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार संजय सिंह यांनी बुधवारी स्वाती मालीवाल यांच्याशी संपर्क केला होता. यावेळी दिल्ली महिला आयोगाच्या सदस्य वंदना सिंह यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी सांगितलं की, मालीवाल यांची भेट त्यांच्याच निवासस्थानी झाली. मात्र अद्याप मालीवाल यांनी या प्रकरणी कुठलीही केस दाखल केली नाही.

संतोष कानडे

Delhi Arvind Kejriwal AAP Updates : दिल्लीच्या राजकारणात मागच्या काही दिवसांपासून स्वाती मालीवाल यांचा मुद्दा चर्चिला जातोय. आम आदमी पक्षाच्या महिला खासदार स्वाती मालीवाल यांना मुख्यमंत्री निवासात मारहाण आणि त्यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना घडली होती. पक्षाचे राज्यसभा खासदार संजय सिंह यांनी या घटनेला पुष्टी देत दोषींविरोधात कारवाई करण्याचा मुद्दा उपस्थित केला होता. हाच मुद्दा आता भाजपने उचलून धरला असून सध्या तरी स्वाती मालीवाल कुठे आहेत, याचा थांगपत्ता लागत नाहीये.

येत्या १० दिवसांमध्ये दिल्लीमध्ये लोकसभेच्या निवडणुकांसाठी मतदान होणार आहे. त्यातच स्वाती मालीवाल यांच्या मुद्द्यावरुन भाजप रस्त्यावर येऊन आंदोलन करत आहे. आम आदमी पक्षाला महिला सुरक्षेच्या कारणावरुन घेरलं जात आहे. आपचे राज्यसभा खासादर आणि दिल्ली महिला आयोगाच्या माजी अध्यक्ष स्वाती मालीवाल यांच्याशी मुख्यमंत्री निवासस्थानी झालेल्या गैरवर्तनाच्या विरोधात भाजपने बुधावरी आंदोलन केलं आहे.

अरविंद केजरीवाल करणार कारवाई- संजय सिंह

आम आदमी पक्षाचे नेते संजय सिंह यांनी सीएम निवासस्थानी घडलेल्या गैरप्रकाराला पुष्टी दिली आहे. ते म्हणाले की, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे विभव कुमारच्या माध्यमातून स्वाती मालीवालसोबत झालेल्या गैरवर्तनावरुन कडक कारवाई करणार आहेत. स्वाती ह्या आम आदमी पक्षाच्या जुन्या नेत्या आहेत. आम्ही त्यांच्यासोबत उभे आहोत.

कुठे आहेत स्वाती मालीवाल?

स्वाती मालीवाल प्रकरणावरुन दिल्ली पोलिस सक्रीय झाले आहेत. पोलिसांनी त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. सूत्रांनी सांगितलं की, स्वाती मालीवाल ह्या त्यांच्या घरीही नाहीत आणि जवळच्या नातेवाईकांकडेही नाहीत.

पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार संजय सिंह यांनी बुधवारी स्वाती मालीवाल यांच्याशी संपर्क केला होता. यावेळी दिल्ली महिला आयोगाच्या सदस्य वंदना सिंह यादेखील उपस्थित होत्या. त्यांनी सांगितलं की, मालीवाल यांची भेट त्यांच्याच निवासस्थानी झाली. मात्र अद्याप मालीवाल यांनी या प्रकरणी कुठलीही केस दाखल केली नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT