Narendra Modi sakal
देश

Narendra Modi : ‘टीम मोदी’ची उत्सुकता!,आज ‘एनडीए’चे सत्तारोहण; शेजारील देशांचे अध्यक्ष, पंतप्रधान उपस्थित राहणार

देशात सलग तिसऱ्या कारकिर्दीत प्रवेश करणाऱ्या ‘एनडीए’प्रणीत नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या टीममध्ये कोणकोणते शिलेदार असतील, याची उत्सुकता लागली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : देशात सलग तिसऱ्या कारकिर्दीत प्रवेश करणाऱ्या ‘एनडीए’प्रणीत नरेंद्र मोदी सरकारच्या नव्या टीममध्ये कोणकोणते शिलेदार असतील, याची उत्सुकता लागली आहे. उद्या (ता.९) राष्ट्रपती भवन येथे नरेंद्र मोदी यांच्यासोबत ४० जणांचा शपथविधी होऊ शकतो. यात महाराष्ट्रातून भाजपचे नेते नितीन गडकरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल, शिवसेनेचे नेते संदीपान भुमरे, रक्षा खडसे यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे तेलुगू देसम आणि जनता दल युनायटेड (जेडीयू) या दोन पक्षांनी महत्त्वाच्या खात्यांवर दावा केल्याने मंत्रिमंडळाच्या रचनेत अडथळे आल्याचे सांगितले जात आहे.

१८ व्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ४ जून रोजी लागला आणि त्यात राष्ट्रीय लोकशाही आघाडीला (एनडीए) स्पष्ट बहुमत मिळाले . भाजप हा २४० जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला आहे. काल ‘एनडीए’च्या नेतेपदी नरेंद्र मोदी यांची निवड झाल्यानंतर ‘एनडीए’ने केंद्रात सरकार स्थापनेचा दावा राष्ट्रपतींकडे केला. यानुसार राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी पंतप्रधानपदी नियुक्ती केल्याचे पत्र नरेंद्र मोदी यांच्या स्वाधीन केले.

देशांच्या प्रमुखांची उपस्थिती

राष्ट्रपती भवनात पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी हे रविवारी सायंकाळी सव्वासात वाजता शपथ घेणार आहेत. या सोहळ्यात विविध पक्षांचे नेते आणि मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तसेच या शपथविधीसाठी शेजारील देशांच्या अध्यक्षांना निमंत्रित केले आहे. २०१४ मध्ये शपथविधीलाही या देशांच्या प्रमुखास निमंत्रित केले होते. उद्याच्या शपथविधीला उपस्थित राहणाऱ्यांत श्रीलंकेचे अध्यक्ष रानिल विक्रमसिंघे, बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना, मालदीवचे अध्यक्ष डॉ. महंमद मुईज्जू, सेचेल्सचे उपाध्यक्ष अहमद अफिफ, मॉरिशसचे पंतप्रधान प्रवींदकुमार जगन्नाथ, नेपाळचे पंतप्रधान पुष्पकमल दहल प्रचंड, भूतानचे पंतप्रधान शेरिंग टोब्गे उपस्थित राहणार आहेत. या निमित्ताने शेजारील देशांची संबंध वृद्धिंगत होईल, असा दावाही केला. यावेळी पाकिस्तानच्या पंतप्रधानांना मात्र निमंत्रित केलेले नाही. शेख हसिना यांचे शनिवारी सायंकाळी राजधानीत आगमन झाले.

सुरक्षा व्यवस्था

उद्या होणाऱ्या शपथविधीसाठी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. राष्ट्रपती भवन परिसर व ल्युटन्स झोन परिसरात वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. तसेच दिल्लीतील विमानतळावर सुद्धा ‘नो फ्लाईंग झोन’च्या संदर्भात निर्देश जारी करण्यात आले आहेत. ड्रोनच्या माध्यमातून सुरक्षा यंत्रणा लक्ष ठेवणार आहे. तसेच ‘सीआयएसएफ’कडे शपथविधी कार्यक्रमाची सुरक्षा सोपविण्यात आली आहे.

चाळीस जणांचे मंत्रिमंडळ

नरेंद्र मोदी यांच्यासोबत भाजप आणि घटक पक्ष तेलुगू देसम, जेडीयू, शिवसेना, लोकजनशक्ती पक्ष आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे खासदार देखील शपथ घेणार आहेत. तब्बल ४० खासदार मंत्रिपदाची शपथ घेतील, असा अंदाज बांधला जात आहे. भाजपला बहुमत नसल्याने एनडीएतील घटकपक्षांना अधिक संधी द्यावी लागणार आहे. यामुळे भाजपचे १८ ते २० तसेच घटक पक्षांचे तेवढेच नेते मंत्रिपदाची शपथ घेतील. जुलै महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पी अधिवेशनानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.

तेलुगू देसमच्या महत्त्वपूर्ण मागण्या

‘एनडीए’तील १६ खासदार असलेला तेलुगू देसम हा सर्वात मोठा पक्ष आहे. या पक्षाची लोकसभा अध्यक्षांची मागणी होण्याची शक्यता नाही. परंतु काही महत्त्वाची खाती त्यांच्या पारड्यात जाण्याची शक्यता आहे. यात इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान, शिपिंग ही खाती तेलुगू देसमकडे जाण्याची शक्यता आहे. तेलुगू देसमला तीन कॅबिनेट व दोन राज्यमंत्रिपदे मिळण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT