बस्ती (उत्तर प्रदेश) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज प्रचारसभेत काँग्रेस आणि समाजवादी पक्षावर टीका करताना त्यांना ‘पाकिस्तानचे सहानुभूतीदार’ असे संबोधले. पाकिस्तानकडे अण्वस्त्रे आहेत असे सांगून हे दोन पक्ष देशवासीयांना भीती दाखवत आहेत, असा आरोपही मोदी यांनी केला.
मोदी यांची आज उत्तर प्रदेशातील बस्ती येथे सभा झाली. राहुल गांधी यांची काँग्रेस आणि अखिलेश यादव यांचा समाजवादी पक्ष(सप) यांच्यात २०१७ मध्येही आघाडी झाली होती, त्यांनी विधानसभेसाठी एकत्र प्रचार केला होता आणि तरीही ते अपयशी ठरले होते, अशी आठवण मोदी यांनी यावेळी सांगितली. ‘काँग्रेस आणि सपच्या शहजाद्यांच्या या ‘फ्लॉप’ चित्रपटाचे यंदाही पुन्हा प्रक्षेपण होईल,’ असा टोला मोदींनी लगावला.
मोदी म्हणाले, ‘एकेकाळी दहशतवादाचा शस्त्र म्हणून वापर करत भारताला आव्हान देणाऱ्या देशात नागरिकांना अन्नपाण्यासाठी भटकावे लागत आहे. पाकिस्तानची हवा तर निघून गेली आहे, पण त्यांचे सहानुभूतीदार असलेले ‘सप’ आणि काँग्रेस आजही आपल्याला भीती दाखवत आहेत. पाकिस्तानकडे अणुबाँब आहे त्यामुळे आपण त्यांना घाबरून राहावे, असे या पक्षांचे म्हणणे आहे. हे मोदींचे सशक्त सरकार आहे. आमच्यावर दबाव आणणाऱ्यांना आम्ही त्यांच्याच घरात घुसून त्यांना पराभूत करतो,’
‘ते झोपेतून जागे होतील’
उत्तर प्रदेशमध्ये लोकसभेच्या ८० जागा आहेत. यापैकी ७९ जागांवर इंडिया आघाडीचा विजय होईल, असा दावा ‘सप’चे प्रमुख अखिलेश यादव यांनी केला आहे. त्यावर प्रत्युत्तर देताना मोदी म्हणाले, ‘चार जूनला राज्यातील जनता सप आणि काँग्रेसला झोपेतून जागे करणार आहे. निकालानंतर हे लोक त्यांच्या पराभवाचे खापर ‘ईव्हीएम’वर फोडतील.’ अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण न स्वीकारल्याबद्दलही मोदींनी या पक्षांवर टीका केली. ‘काँग्रेसच्या शहजाद्याला राम मंदिराबाबतचा सर्वोच्च न्यायालयाचा निर्णयही बदलायचा आहे.’ असा आरोप मोदींनी केला.
आरक्षणावरूनही टीका
राज्यघटनेबाबत चिंता असल्याचे काँग्रेस दाखवत आहे, मात्र ते त्यांच्या पक्षाचीही घटना पाळत नाहीत, असा आरोप पंतप्रधान मोदींनी केला. ‘सोनिया गांधींना पक्षाचे अध्यक्षपद दिले, त्यावेळी सीताराम केसरी यांना बाथरूममध्ये कोंडले होते. या पक्षालाच राज्यघटनेत बदल करून दलित आणि मागासवर्गीयांचे आरक्षण रद्द करायचे आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.