Tamil Nadu AIADMK Edappadi K. Palaniswami 
देश

Tamil Nadu AIADMK: अन्ना द्रमुकने भाजपसोबत युती तोडण्यामागचं खरं कारण आलं समोर!

कार्तिक पुजारी

चेन्नई- तमिळनाडूतील अन्ना द्रमुकने (AIADMK) भारतीय जनता पक्षासोबत सर्व संबंध तोडण्याचा ठराव पक्षाच्या बैठकीत मंजूर केला होता. त्यामुळे दक्षिणेत सत्तेला गवसणी घालण्याच्या भाजपच्या प्रयत्नांना खिळ बसल्याचं बोललं जातं. भाजपच्या राज्यातील नेतृत्वाने अन्ना द्रमुकच्या आदरणीय व्यक्तींवर टीका केल्याने युती तोडल्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलं. पण, भाजप आणि अन्ना द्रमुक यांच्यातील युती तुटण्यामागचे खरे कारण समोर आलं आहे.

एआयएडीएमकेचे माजी मंत्री केसी करुप्पान्नान यांनी याबाबत खुलासा केला आहे. २०२६ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजप नेतृत्व तमिळनाडूतील भाजपचे प्रदेशाध्यक्ष के अन्नामलाई यांना मुख्यमंत्री पदाचे उमेदवार करण्यासाठी आग्रही होते. आम्हाला ते मान्य नव्हते. त्यामुळे आम्ही युती तोडण्याचा निर्णय घेतला असं केसी करुप्पान्नान यांनी म्हटलं. एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलंय. (AIADMK broke the alliance with BJP because)

के अन्नामलाई यांनी माजी मुख्यमंत्री जयललीता यांच्यावर टीका केली होती. तसेच पक्षाचे मेंटर अन्नादुराई यांच्यावरही टीकास्त्र सोडले होते. आम्ही आमच्या पक्षातील नेत्यांचा अपमान सहन करु शकत नाही. त्यामुळे आम्ही राष्ट्रीय लोकशाही आघाडीसोबत राहणार नाही. त्यामुळेच वेगळे होण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयावर आम्ही ठाम आहोत, असं केसी करुप्पान्नान म्हणाले.

अन्ना द्रमुकने भाजपसोबत घरोबा नाकारला आहे. त्यामुळे मोदी सरकारसाठी हा मोठा धक्का असल्याचं मानलं जातं. भाजपला दक्षिणेमध्ये हातपाय पसरण्याची इच्छा आहे. पण, अन्ना द्रमुकच्या या निर्णयामुळे त्यांना महत्त्वाकांक्षेला आवर घालावा लागणार आहे. आता डीएमके आणि एआयडीएमके भाजपच्या विरोधात असल्याने भाजपला तमिळनाडूमध्ये स्वतंत्र विचार करावा लागणार आहे.

कर्नाटकमध्ये भाजपला सत्ता गमवावी लागली आहे.त्यानंतर भाजप सतर्क झाला आहे. भाजपने नुकतेच कर्नाटकमध्ये धर्मनिरपेक्ष जनता दलाशी युती केली आहे. त्यामुळे येत्या लोकसभा निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्र निवडणूक लढवतील. मात्र, इतर राज्यांमध्ये भाजपला मित्रपक्ष मिळण्यास अडचण येत आहे. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT