Tamil Nadu Madurai railway Fire 8 persons killed 20 injured train fire mishap Official 
देश

Tamil Nadu Fire News : तामिळनाडू ट्रेनला भीषण आग! १० ठार, २० जण जखमी

रोहित कणसे

तामिळनाडूच्या मदुराई येथे ट्रेनला भीषण आग लागल्याचा प्रकार समोर आला आहे. लखनऊ- रामेश्वर ट्रेनला ही आग लागली असून या घटनेत १० जण ठार झाले अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. ट्रेनमधून गॅस सिंलेंडरची तस्करी केली जात असल्यामुळे आग लागल्याचे कारण सांगितले जात आहे.

तामिळनाडूतील मदुराई रेल्वे स्थानकावर शनिवारी सकाळी हा अपघात झाला. लखनऊ-रामेश्वरम एक्स्प्रेसमध्ये ही घटना घडल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले. आठही बळी उत्तर प्रदेशातील रहिवासी असल्याचे सूत्रांनी सांगितले. आग लागलेल्या डब्यात एकूण ५५ प्रवासी होते, असे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पुनालूर-मदुराई एक्स्प्रेसमध्ये आज पहाटे ५ : १५ वाजता मदुराई यार्ड येथे खाजगी डब्यात आग लागल्याची माहिती मिळाली. अग्निशमन दलाने आग आटोक्यात आणली असून अन्य डब्यांचे कोणतेही नुकसान झालेले नाही. प्रवाशांना गॅस सिलिंडरची तस्करी केल्याचा आरोप आहे ज्यामुळे आग लागली दक्षिण रेल्वे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने एएनआय या वृत्तसंस्थेने याबद्दल माहिती दिली आहे.

पीटीआय य़ा वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, या आगीच्या दुर्घटनेत ८ जण ठार, २० जखमी झाल्याचे अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले आहे।

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: वांद्रे पश्चिम विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आशिष शेलार आघाडीवर

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT