target killing of hindu leader is not terrorist act under uapa said madras high court knp94 
देश

हिंदू नेत्याची टार्गेट किलिंग दहशतवादी कृत्य नाही! कोर्टाकडून आरोपीला जामीन मंजूर

एखाद्या हिंदू धार्मिक नेत्याची टार्गेट किलिंग किंवा त्याच्या हत्येचा कट दहशतवाद माणला जाऊ शकतो का? अशी उलट विचारणा कोर्टाने अधिकाऱ्यांना केली आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- मद्रास हायकोर्टाने यूएपीए अंतर्गत अटकेत असलेल्या एका व्यक्तीला जामीन मंजूर केला आहे. तसेच त्याच्या कृत्याला दहशतवाद माणण्यास नकार दिला आहे. एखाद्या हिंदू धार्मिक नेत्याची टार्गेट किलिंग किंवा त्याच्या हत्येचा कट दहशतवाद माणला जाऊ शकतो का? अशी उलट विचारणा कोर्टाने अधिकाऱ्यांना केली आहे.

तमिळनाडू पोलिसांनी मागील वर्षी अनलॉफूल अॅक्टिव्हिटिज प्रिव्हेन्शन कायदा UAPA अंतर्गत एकाला अटक केली होती. पुराव्यानुसार असं स्पष्ट होतं की आरोपीने काही धार्मिक नेत्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने कट रचला होता. (target killing of hindu leader is not terrorist act said madras high court)

न्यायमूर्ती एसएस सुंदर आणि न्यायमूर्ती सुंदर मोहन यांच्या पीठाने याप्रकरणी सुनावणी केली. पीठाने म्हटलं की, यूएपीएच्या १५ व्या कलमांतर्गत याची व्याख्या स्पष्ट करण्यात आली आहे. पण, अधिकाऱ्यांनी कोणत्या कलमांतर्गंत दहशतवादी कृत्य ठरवलं हे स्पष्ट केलं नाही.

यूएपीएच्या कलम १५ मध्ये कोणत्याही कृत्याला तेव्हाच आणता येईल जेव्हा गुन्हेगारी कृत्य भारतीय एकता, अखंडता, सुरक्षा आणि आर्थिक सुरक्षा किंवा सार्वभौमत्वता यांना धोक्यात आणण्याच्या हेतूने केली गेली असेल. दहशत माजवण्याच्या इराद्याने किंवा भारतात आणि विदेशी भूमीवर लोकांच्या एका वर्गावर हल्ला करण्याच्या हेतूने केला असेल, असं कोर्टाने म्हटलं.

याचिकेत दावा करण्यात आला होता की, आरोपी आसिफ मुस्तहीन याने काही हिंदू धार्मिक नेता आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या सदस्यांच्या हत्येचा कट रचला. त्यामुळे यूएपीएच्या कमल १८ ते ३८ अंतर्गत दहशतवादी कृत्यासाठी कलम लावण्यात यावेत. आसिफला २६ जुलै २०२२ रोजी एनआएएने अटक केली होती.

कोर्टाने म्हटलंय की, दहशतवादी कृत्य किंवा अशा प्रकारचा कट रचल्याचे पुरावे पुरेसे नाहीत. त्यानंतर कोर्टाने आसिफला जामीन मंजूर केला आहे. हिंदू धार्मिक नेत्याच्या हत्येचा कट रचने दहशतवादी कृत्य होऊ शकतो का? अशी विचारना कोर्टाने अधिकाऱ्यांना केली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: इस्लामपूर मतदारसंघात जयंत पाटील मतांची आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT