नवी दिल्ली : टाटा सन्सने कॅम्पबेल विल्सन (Campbell Wilson) यांची एअर इंडियाचे सीईओ (Air India) आणि व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे. कंपनीच्या निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. एअर इंडिया बोर्डाने विल्सनच्या नियुक्तीला मान्यता दिली असून, जी आवश्यक नियामक मंजुरींच्या अधीन आहे, असे जारी करण्यात आलेल्या निवेदनात स्पष्ट करण्यात आले आहे. 50 वर्षीय विल्सन यांना प्री-सर्व्हिस आणि कमी खर्चातील एअरलाइन्समध्ये काम करण्याचा जवळपास 26 वर्षांचा अनुभव आहे. (Tata Sons Appoints Campbell Wilson As New Air India CEO)
विल्सन हे विमान क्षेत्रातील दिग्गज असून त्यांनी अनेक क्षेत्रात जागतिक बाजारपेठेत काम केले आहे, असे एअर इंडियाचे चेअरमन एन चंद्रशेखरन (Air India Chairmen N Chandrasekaran) यांनी सांगितले. एअर इंडियाला आशियातील एअरलाइन ब्रँड बनवण्यासाठी त्यांचा अनुभव उपयुक्त ठरेल असा विश्वासही चंद्रशेखर यांनी व्यक्त केला आहे. विल्सन हे सिंगापूर एअरलाइन्सच्या (Singapur AirLines) स्कूटचे (Scoot) 2011 मध्ये संस्थापक सीईओ होते आणि 2016 पर्यंत त्यांनी ही जबाबदारी सांभाळली होती. यानंतर, त्यांनी SIA चे सेल्स आणि मार्केटिंगचे वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणूनही काम केले आहे.
आपली नियु्की म्हणजे सन्मान
दरम्यान, एअर इंडियाच्या सीईओपदी नियुक्ती झाल्यानंतर विल्सन यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, "प्रतिष्ठित एअर इंडियाचे नेतृत्व करण्यासाठी आणि देशातील अत्यंत प्रतिष्ठित टाटा समूहाचा भाग होणे हा आपल्यासाठी सन्मान आहे. एअर इंडिया जगातील सर्वोत्कृष्ट एअरलाइन्सपैकी एक होण्यासाठी सज्ज असून ही महत्त्वाकांक्षा प्रत्यक्षात आणण्याच्या मिशनमध्ये एअर इंडिया आणि टाटा समूहामध्ये सामील होण्यासाठी उत्साहित असल्याच्या भावना विल्सन यांनी व्यक्त केल्या आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.