Teacher dismissed Sakal
देश

Teacher dismissed: प्रभू रामाला काल्पनिक पात्र म्हणणे शिक्षिकेला पडलं महागात; शाळेतून हकालपट्टी

Calling Lord Rama a fictional character cost the teacher; expulsion from school; शिक्षिकेने रामायण, महाभारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टीका केल्याने उजव्या विसारसरणीचा गट आक्रमक झाला होता.

कार्तिक पुजारी

बेंगळुरु- रामायण, महाभारताला काल्पनिक म्हटल्याने कर्नाटकातील मंगळुरुतील एका शिक्षिकेला शाळेतून काढून टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे. शिक्षिकेने रामायण, महाभारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत कथित आक्षेपार्ह टीका केल्याने उजव्या विसारसरणीचा गट आक्रमक झाला होता. त्यानंतर ही कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. (Teacher dismissed After She Tells Students Mahabharat Ramayan Imaginary criticize Prime Minister Narendra Modi)

भाजप आमदार वेदास कामथ यांच्या समर्थक गटाने या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेतली होती. याप्रकरणी असा आरोप करण्यात आलाय की, सेंट जॉर्ज इंग्लिश एचआर प्रायमरी स्कूलच्या शिक्षिकेने आपल्या विद्यार्थ्यांना महाभारत आणि रामायण हे घडलेलं नाही. केवळ त्या काल्पनिक कथा आहेत असं सांगितलं. तसेच शिक्षिकेने पंतप्रधान मोदी यांच्याबाबतही आक्षेपार्ह बोलल्याचा आरोप आहे.

शिक्षिकेने २००२ मधील गोध्रा दंगल आणि बिल्किस बानो सामूहिक बलात्काराचा उल्लेख करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली. शिक्षिकेने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये द्वेषाची भावना पेरण्याचा प्रयत्न केला असा आरोप उजव्या गटाने आपल्या तक्रारीमध्ये केला आहे. शनिवारी भाजप आमदाराच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. शिक्षिकेच्या निलंबनाची मागणी यावेळी करण्यात आली होती.

भाजप आमदार यावेळी म्हणाले की, 'तुम्ही पूजा करणारा येशू शांततेवर विश्वास ठेवतो. पण, शाळेतील सिस्टर हिंदू मुलांना टिकली न लावण्याचा, बांगड्या न घालण्यास सांगतात. रामावर दूध टाकणे विनाकारण आहे असं सांगतात. कोणी तुमच्या श्रद्धांचा अपमान केल्यास काय करणार? तुम्ही शांत बसणार नाही.' पालकांनी दावा केलाय की शिक्षिकेने सातवीच्या मुलांना प्रभू राम एक काल्पनिक पात्र असल्याचं सांगितलं.

शाळा प्रशासनाकडून कथित आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी शिक्षिकेची हकालपट्टी करण्यात आली आहे. या प्रकरणी DDPI तपास करत आहेत. शाळा प्रशासनाने निवेदनात म्हटलंय की, सेंट जॉर्ज स्कूलला ६० वर्षांचा इतिहास आहे. आतापर्यंत अशी घटना घडली नाही. दुर्दैवी घटनेमुळे आमच्यात आणि तुमच्यात अविश्वास निर्माण झालाय. तो विश्वास पुन्हा प्राप्त करण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आम्ही काम करत राहू. दरम्यान, याप्रकरणी अद्याप एफआयआर दाखल करण्यात आलेला नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दीपक केसरकर म्हणजे 'ऑल राउंडर सचिन तेंडुलकर', माझ्यासाठी ते 'फायटर' आहेत; असं का म्हणाले एकनाथ शिंदे?

Nagpur Crime : एमडी द्यायला आला अन्‌ पोलिसांच्या तावडीत अडकला, ५४ ग्रॅम एमडीसह पिस्तूल जप्त

Ranji Trophy 2024-25: मुंबईसाठी करो वा मरो परिस्थिती, महाराष्ट्राचे पॅकअप; पहिल्या टप्प्यानंतर असे आहेत पाँइंट्स टेबल

Healthy Tea : सिताफळ बासुंदी खाल्ली असेल, सिताफळाचा चहा प्यायलात का? होतील अनेक फायदे

Sushma Andhare : आता काय नारायण राणेंना अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष करायचे का? सुषमा अंधारेंची सडकून टीका

SCROLL FOR NEXT