Narenra Modi Amit Shah JP Nadda esakal
देश

Gujarat Elections 2022: चाळीस हजार लोकांची एक गुप्त टीम भाजपसाठी काम करतेय...

संतोष कानडे

Powerful Organization Help BJP in Gujarat elections 2022

नवी दिल्लीः भाजपची निवडणूक यंत्रणा अत्यंत बळकट असल्याचं सांगितलं जातं. पक्षाचे सर्व्हे अत्यंत गोपनीय रितीने पार पडतात. मात्र या संदर्भात एक टीएमएसएस नावाच्या संस्थेचं नाव पुढे येतंय. ही बलाढ्य संस्था भाजपसाठी मागील सात वर्षांपासून काम करत आहे.

गुजरातमध्ये सध्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. काल पहिल्या टप्प्यातील ८९ मतदारसंघांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. १९ जिल्ह्यामध्ये हे मतदान संपन्न झाले. येत्या ५ डिसेंबरला पुढच्या टप्प्यातील मतदान संपन्न होईल.

असे काही मतदारसंघ असतात जे भाजपला कायम जड जातात. तिथं विजय मिळवणं जवळपास शक्य नसतं. अशा अवघड ठिकाणी काम करण्यासाठी भाजपकडे एक ४० हजार लोकांची संस्था असल्याची माहिती आहे. २०१५मध्ये उत्तर प्रदेशात या संघटनेचं काम सुरु झालं. भाजपला विजय मिळवून देणं, हाच त्यांचा उद्देश आहे.

हेही वाचाः आरामात फेडू शकाल अशीच घ्या कर्जे....

यासंदर्भात न्यूज १८ ने वृत्त दिले आहे. गुजरातमध्ये खेडबृह्मा नावाचा एक मतदारसंघ आहे. १९९५पासून येथील मतदारांनी भाजपला डावलेलं आहे. यावेळी तिथे भाजपने जोर लावलाय. या टीएमएसएस (TMSS) संघटनेचे सरचिटणीस अतुल मकाडिया यांनी सांगितलं की, खेडबृह्मा मतदारसंघ हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे आम्ही या विभागात आदिवासी समाजाकडे अध्यक्षपद दिलं. आदिवासी समाजात काम करणं सुरु केलं. त्यामुळे आमच्याकडे १०० असे कार्यकर्ते तयार झाले जे आदिवासींसाठी काम करत आहेत.

नेमकं काय आहे टीएमएसएस?

या संघटनेचं काम मतदारांवर प्रभाव टाकण्याचं आहे. जे मतदार भाजपपासून दूर आहेत आणि इतर पक्षांना मतदान करतात त्यांची मनं वळविण्याचं काम टीएमएसएस संघटना करते. संस्थेचे उपाध्यक्ष हिरेन मेहता यांनी सांगितलं की, आमच्यासोबत ४० हजार सदस्य आहेत. प्रत्येक जिल्हा तालुका आणि विधानसभा मतदारसंघात पदाधिकारी आहेत. भाजपप्रमाणे आमच्याकडे मोर्चा, विभाग आहेत. गुजरातमध्ये आम्ही ७८ जागांवर सक्रीय आहोत. प्रत्येत मतदारसंघात ५ ते १० हजार मतदारांना आम्ही प्रभावित करु शकतो.

'जिथं स्थानिक उमेदवार नसतो तिथं संस्था काम करते'

टीएमएसएस संस्थेचे गुजरात अध्यक्ष प्रवीण नाखुम यांनी सांगितलं की, जेव्हा भाजप स्थानिक उमेदवाराला तिकीट देत नाही तेव्हा तेथील लोक उमेदवारावर नाराज असतात. तेव्हा आम्ही जातो आणि त्यांना समजावतो. उमेदवारापेक्षा पक्षाकडे आणि विचारधारेकडे बघा... असं सांगून त्यांचा रोष शांत करण्यासाठी आमच्या नेटवर्कचा वापर करतो.

भाजपने या बलाढ्य यंत्रणेद्वारे गुजरातवर लक्ष्य केंद्रीत केलं आहे. गुजरात हे राज्य भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यामुळे येनकेन प्रकारे इथं सत्ता स्थापन करणं भाजपला गरजेचं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Interview : ‘लाडकी बहीण’च्या यशामुळे ‘पंचसूत्री’चा घाट! उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा दावा

Maharashtra Assembly Election : विधानसभा निवडणूक काळात राज्य शासनाचा मोठा निर्णय, राज्यातील 'या' शाळा आजपासून सहा दिवस राहणार बंद

Prataprao Pawar : ‘ग्लोबल प्राइड ऑफ महाराष्ट्र’ पुरस्काराने प्रतापराव पवार यांचा लंडनमध्ये सन्मान

Kartik Purnima 2024 Wishes: आज कार्तिक पौर्णिमा, देव दिवाळीनिमित्त प्रियजनांना द्या मराठीतून खास शुभेच्छा

ढिंग टांग : तुमच्या मनातला मुख्यमंत्री कोण…?

SCROLL FOR NEXT