Technician injured in Army helicopter crash in Jammu and Kashmir dies  
देश

Army Helicopter Crash : जम्मू-काश्मिरच्या किश्तवाडमध्ये पुन्हा लष्कारचं हेलिकॉप्टर कोसळलं; तत्रज्ञ ठार

रोहित कणसे

Army Helicopter Crash : जम्मू आणि काश्मीरमधील किश्तवाड जिल्ह्यातील दुर्गम भाग असलेल्या मडवा येथील मचना जंगलात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले असून, त्यात दोन जण जखमी झाले होते. दरम्यान या अपघातात जखमी झालेल्या तंत्रज्ञाचा मृत्यू झाला आहे. संरक्षण सूत्रांनी याबद्दल माहिती दिली आहे. दरम्यान ज्या हेलिकॉप्टरला अपघात झाला ते लष्कराचे एएलएच ध्रुव हेलिकॉप्टर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार हेलिकॉप्टरमध्ये तीन भारतीय सेना आधीकारी प्रवास करत होते. जेथे हेलिकॉप्टर क्रॅश झाले तो किश्तवाड खूप दुर्गम भाग आहे. येथे मागील तीन दिवसांपासून सतत पाऊस पडत आहे.

ही पहिली वेळ नाहीये..

हेलिकॉप्टर कोसळण्याची ही पहिली घटना नाहीये, याआधीही अशा अपघातांमध्ये देशातील शूर जवान आणि अधिकाऱ्यांचे प्राण गमावले आहेत. मार्चच्या सुरुवातीस, अरुणाचल प्रदेशातील मंडला हिल प्रदेशाजवळ भारतीय लष्कराचे एव्हिएशन चीता हेलिकॉप्टर क्रॅश झाले आणि त्यातील दोन पायलट ठार झाले होते.

याआधी डिसेंबर २०२१ मध्येही हेलिकॉप्टरमध्ये अशा प्रकारच्या तांत्रिक बिघाडानंतर देशाला जनरल बिपिन रावत, त्यांची पत्नी आणि इतर सपोर्ट स्टाफसह पहिला सीडीएस गमवावे लागले होते. त्यांचे हेलिकॉप्टरही तांत्रिक कारणामुळे कोसळले. असे असतानाही लष्कराच्या विमानात कोणतीही सुधारणा झालेली नाही.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivsena Candidate List: शिवसेनेची पहिली यादी जाहीर, दिग्गज नेते रिंगणात; कोणाला कोठून संधी?

Ramesh Wanjale: मनसेनं ठेवली आठवण! रमेश वांजळेंचे पुत्र मयुरेश वांजळेंना खडकवासल्यातून उमेदवारी जाहीर

Pune Crime : मालकाने पाळीव कुत्र्याला लटकावले फासावर; पर्वतीमध्येही श्वानावर गोळी झाडल्याचा प्रकार उघडकीस

MNS Vidhan Sabha Candidate List: दुसरे ठाकरेही निवडणुकीच्या रिंगणात! मनसेची ४५ उमेदवारांची यादी जाहीर; वरळीतून संदीप देशपांडे

महिला आयोगातील कंत्राटी कर्मचाऱ्यांची कंत्राटे रद्द; ऐन दिवाळीत क्रूर निर्णय घेतल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT