हैदराबाद : तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव (Telangana CM K. Chandrasekhar Rao) तिसऱ्यांदा प्रोटोकॉल मोडू शकतात. सीएम केसीआर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचं विमानतळावर स्वागत करणार नाहीयत. दोन दिवसीय भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला उपस्थित राहण्यासाठी पंतप्रधान मोदी आज (शनिवार) हैदराबादमध्ये पोहोचणार आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, PM मोदी त्याच विमानतळावर उतरण्याच्या काही तास आधी विरोधी पक्षाचे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार यशवंत सिन्हा यांचं बेगमपेट विमानतळावर (Begumpet Airport) स्वागत करतील. KCR यांनी 18 जुलै रोजी होणाऱ्या आगामी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत यशवंत सिन्हा (Presidential Candidate Yashwant Sinha) यांना पाठिंबा जाहीर केलाय.
आज पंतप्रधानांचं स्वागत करण्यासाठी फक्त एक टीआरएस मंत्री (TRS Minister) विमानतळावर उपस्थित राहणार आहे, तर यशवंत सिन्हा यांचं मुख्यमंत्र्यांसह इतर सर्व मंत्री स्वागत करतील. उल्लेखनीय म्हणजे सहा महिन्यांत ही तिसरी वेळ आहे की, सीएम केसीआर पंतप्रधानांच्या स्वागताचा प्रोटोकॉल तोडत आहेत. यापूर्वीही सीएम चंद्रशेखर राव मे महिन्यात बंगळुरूला गेले होते, तेव्हा पंतप्रधान मोदी इंडियन स्कूल ऑफ बिझनेसच्या (ISB) 20 व्या वार्षिक समारंभाला उपस्थित राहण्यासाठी तेलंगणाला गेले होते. शिवाय, यावर्षी फेब्रुवारीमध्ये पंतप्रधानांच्या हैदराबाद दौऱ्यात केसीआर अनुपस्थित होते.
भारतीय जनता पक्षाच्या दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक आजपासून हैदराबादमध्ये सुरू झालीय. हैदराबाद इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटरमध्ये ही बैठक होणार आहे. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, 19 राज्यांचे मुख्यमंत्री आणि भाजपचे इतर वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान मोदी या बैठकीला उपस्थित राहणार असून रविवारी ते राष्ट्रीय कार्यकारिणीला संबोधित करतील, अशी अपेक्षा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.