हैदराबाद : तेलंगणमध्ये यावर्षअखेरीस विधानसभा निवडणूक होणार आहे. ही निवडणूक लढविण्यास इच्छुकांकडून काँग्रेसने अर्ज स्वीकारण्यास सुरुवात केली आहे. या मोहिमेला शुक्रवारपासून प्रारंभ झाला असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्याने सांगितले.
कर्नाटकमध्ये मे महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने सर्वसाधारण श्रेणीतील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज आणि इतर कागदपत्रांसह दोन लाख रुपये आकारले होते. एससी, एसटी वर्गासाठी एक लाख रुपये शुल्क होते.
आता ही निवडणूक मोहीम तेलंगणमध्येही राबविण्याची तयारी काँग्रेसने केली आहे. येथे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि शारीरिकदृष्ट्या कमकुवत प्रवर्गांमधील भावी उमेदवारांना २५ हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे. अन्य वर्गांसाठी हे शुल्क ५० हजार रुपये आहे.
तेलंगणचे माजी उपमुख्यमंत्री दामोदर राजा नरसिंह यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यांची उपसमिती काँग्रेसने नेमली आहे. ही समिती निवडणुकीसाठी उमेदवारांच्या निवडीची कार्यपद्धती तयार करणार आहे, असे तेलंगण प्रदेश काँग्रेस समितीचे कार्याध्यक्ष आणि या उपसमितीचे एक सदस्य महेश कुमार गौड यांनी सांगितले.
अर्जासोबत ‘डीडी’ जोडण्याची सूचना
ते म्हणाले, की निवडणूक लढविण्यास इच्छुक उमेदवारांना भरण्यासाठी आवश्यक अर्ज आज अपलोड केला आहे. तो अर्ज भरून त्यासोबत ५० हजार किंवा २५ हजार रुपयांचा डिमांड ड्राफ्ट जोडायचा आहे. अर्ज दाखल करण्याची मुदत २५ ऑगस्ट आहे. सर्वसाधारण श्रेणीसाठी २५ हजार रुपये शुल्क आकारण्याची शिफारस उपसमितीने केली होती. पण पक्षनेतृत्वाने ती ५० हजार रुपये निश्चित केली आहे, असे गौड यांनी सांगितले.
निवडीची प्रक्रिया...
इच्छुक उमेदवारांना त्यांचे सोशल मीडिया हँडल व अन्य इतर माहिती अर्जात नमूद करावी लागेल, जेणेकरून पक्षाला त्यांची पार्श्वभूमी तपासणे शक्य होईल
सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात प्रदेश निवडणूक समितीची बैठक होऊन सर्व अर्जांची छाननी होईल
छाननीनंतर आणि अखिल भारतीय काँग्रेस समितीला शिफारस करण्यात येईल
तेलंगणमध्ये २०१४ आणि २०१८ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने कोणतेही शुल्क आकारले नव्हते. मात्र २००९ मध्ये दहा हजार रुपये घेतले होते. या अर्ज शुल्कामुळे निवडणूर लढविण्याबाबत गंभीर असलेले उमेदवार पुढे येतील, अशी अपेक्षा पक्षाला आहे.
- महेश कुमार गौड, कार्याध्यक्ष, तेलंगण प्रदेश काँग्रेस समिती
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.