Telangana Formation Day 2023 esakal
देश

Telangana Formation Day 2023 : 44 वर्षांच्या संघर्षानंतर तेलंगणाची स्थापना...10 मुद्द्यांमध्ये समजून घ्या इतिहास

1956 पर्यंत देशात प्रांतीय व्यवस्था लागू होती

सकाळ डिजिटल टीम

Telangana Formation Day 2023 : 1956 पर्यंत देशात प्रांतीय व्यवस्था लागू होती, सुमारे पाचशे संस्थानांची राज्य म्हणून स्थापना करायची होती. बराच विचार करून भाषा हा त्यासाठी आधार बनवायचा असे ठरले.

1948 मध्ये, जवाहरलाल नेहरू, पट्टाभी सीतारामय्या आणि वल्लभभाई पटेल यांचा समावेश असलेली एक समिती स्थापन करण्यात आली. ज्याचे मुख्य कार्य राज्यांच्या पुनर्रचनेसाठी आधार शोधणे हे होते. समितीने आपल्या अहवालात प्रशासकीय आधारावर राज्यांच्या सीमा निश्चित करण्याची शिफारस केली होती, परंतु तसं घडलं नाही.

अहवाल सार्वजनिक होताच तेलुगू भाषिकांनी विरोध सुरू केला.

ऑक्टोबर 1952 मध्ये, पोट्टी श्रीरामालू यांनी भाषेच्या आधारावर वेगळ्या तेलगू राज्याच्या मागणी केली. त्यासाठी उपोषण सुरू केलं आणि 56 व्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला. या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यावर मद्रास प्रेसिडेन्सीमधून आंध्र प्रदेश हे वेगळे राज्य तयार झालं. तेलंगणा हा या राज्याचा एक भाग होता जो 2014 मध्ये स्वतंत्र राज्य म्हणून घोषित करण्यात आला.

आज जरी तेलंगणा वेगळ राज्य असलं तरी त्यासाठी बराच संघर्ष करावा लागला होता.

1. तेलंगणा हा आंध्रप्रदेशचा प्रमुख भाग होता, परंतु 1969 मध्ये आंध्रपासून वेगळ राज्य स्थापन करण्याची मागणी जोर धरू लागली. या मागणीने तेलंगण आंदोलनाचं रूप घेतलं.

2. आंदोलन सातत्याने सुरू होते. 2001 मध्ये याला आणखी धार देण्यासाठी के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणा राष्ट्र समिती (TRS) ची स्थापना केली.

3. तेलंगणा राष्ट्र समितीने 2004 मध्ये निवडणूक लढवली आणि 26 विधानसभा जागा जिंकल्या, हेच वर्ष होते जेव्हा यूपीएने तेलंगणाच्या मागणीचा समावेश आपल्या सामान्य कार्यक्रमात केला होता.

4. 2008 मध्ये तेलुगु देसम पक्षानेही तेलंगणा आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला होता. त्यानंतर वर्षभरानंतरच चंद्रशेखर उपोषणाला बसले.

5. या उपोषणाचा परिणाम झाला आणि केंद्र सरकारने तेलंगण राज्याच्या निर्मितीची प्रक्रिया सुरू केली, मात्र प्रचंड विरोधामुळे ही प्रक्रिया थांबवावी लागली.

6. 2010 मध्ये, पुन्हा एकदा या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली. या समितीचे नाव कृष्णा समिती असे होते ज्याने सहा पर्याय दिले होते.

7. 2013 मध्ये तेलंगणाला वेगळे राज्य करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. आंदोलने सुरूच राहिली, पण दरम्यानच्या काळात केंद्र सरकारने आंध्रप्रदेशच्या विभाजनाचा प्रस्ताव मंजूर केला.

8. 2014 मध्ये, आंध्रप्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री किरण रेड्डी उपोषणाला बसले होते. हे विधेयक लोकसभेत प्रचंड विरोधानंतर मांडण्यात आले आणि ते मंजूर झाले. त्याला राज्यसभेतही मंजुरी मिळाली.

9. 1 मार्च 2014 रोजी तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी या विधेयकाला मंजुरी दिली. येथे राष्ट्रपती राजवट लागू झाली आणि त्यानंतर निवडणुका झाल्या.

10. 2 जून 2014 मध्ये तेलंगणा हे नवीन राज्य बनले आणि चंद्रशेखर राव हे पहिले मुख्यमंत्री बनले. तेलंगणा चळवळीसाठी स्थापन झालेली टीआरएस आता बीआरएस म्हणून ओळखली जाते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: जितेंद्र आव्हाड यांची विजयाच्या दिशेने वाटचाल!

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुती शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार विलास तरे 46,178 मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

SCROLL FOR NEXT