Ancient stone tools sakal
देश

Hyderabad News : विद्यार्थ्याने शोधले दगडाचे प्राचीन अवजार; सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचे उपकरण

तेलंगणमधील एका शालेय विद्यार्थ्याने दगडाच्या अतिशय प्राचीन उपकरणाचा शोध लावला आहे.

सकाळ न्यूज नेटवर्क / वृत्तसंस्था

हैदराबाद - तेलंगणमधील एका शालेय विद्यार्थ्याने दगडाच्या अतिशय प्राचीन उपकरणाचा शोध लावला आहे. हे उपकरण सुमारे एक लाख वर्षांपूर्वीचे आहे. राज्यातील दादापूर या गावातील जि.प. प्रशालेतील विद्यार्थी दोब्बाली शिवकुमार याने शोधलेला हा दगड पुरातत्त्व क्षेत्रात महत्त्वाचा आहे.

या विद्यार्थ्याने प्रारंभिक पाषाणकालिन युगातील अचुएलियन दगडाचे उपकरण शोधले असून, प्राचीन इतिहासाच्या दृष्टीने तो महत्त्वाचा आहे. अचुएलियन या शब्दाची उत्पत्ती अचुएलिन या फ्रान्स शब्दापासून झाली. त्याने तत्काळ या दगडी उपकरणाबद्दल आपले शिक्षक ए.संतकुमार आणि एम. कृष्णा यांच्यासह कोठा तेलंगण चरित्र गटाच्या सदस्यांनाही त्याबद्दल सांगितले.

तेलंगणमधील बुर्का गड्डा कोठाच्या उत्तर व दक्षिण क्षेत्रात असलेल्या छोट्या टेकड्यांमध्ये हे दगडी उपकरण आढळले. विशेषत: या परिसरातील दक्षिणेकडील पहाडी क्षेत्र पलुगु (तेलुगुमध्ये एक प्रकारचा दगड) येथे विविध प्रकारचे दगड आढळतात. त्याचप्रमाणे, उत्तरेकडे ग्रॅनाईट प्रकारचा दगड सापडतो. पश्चिमेकडे सखल भागात एक तलावदेखील आहे.

कर्नाटकमधील आंतरराष्ट्रीय पुरातत्त्व संशोधक रवी कोरीसेटर आणि कोठी तेलंगण इतिहास गटाचे संयोजक श्रीरामोजु हरगोपाल यांनी या दगडी उपकरणांच्या छायाचित्रांची सत्यता तपासली. हे उपकरण किमान एक लाख वर्षांपूर्वीचे असल्याचा त्यांचा दावा आहे. प्रारंभिक पाषाणकालिन युगात या दगडी उपकरणाचा कुऱ्हाडीसारखा वापर झाला असावा, असा अंदाज आहे.

दगडी उपकरणाची वैशिष्ट्ये

वय - सुमारे एक लाख वर्षे

लांबी - १२.५ सें. मी.

रुंदी - ८.५ सें. मी.

जाडी - ३.५ सें. मी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crime News: ‘सकाळ’च्या डिजिटल पानाचा गैरवापर; एकावर गुन्हा दाखल, निवडणूक प्रचाराबाबतच्या खोडसाळपणाची पोलिसांकडून गांभीर्याने दखल

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश! इलेक्शन ड्युटी नाकारणाऱ्या १३४ कर्मचाऱ्यांवर दाखल होणार गुन्हे; ‘या’ ८ मतदारसंघातील आहेत कर्मचारी

Pune News : राहुल गांधी यांनी दोन डिसेंबरला न्यायालयात हजर राहावे; पुणे प्रथमवर्ग न्यायालयाचा आदेश

Pune News : मविआच्या काळात महाराष्ट्राच्या विकासाचा वेग मंदावला; केंद्रीय मंत्री गजेंद्र सिंह शेखावत

IPL Auction साठी पर्थ कसोटीवेळीच 'हा' कोच संघाला सोडणार अन् ऑस्ट्रेलियातून सौदी अरेबियात पोहचणार

SCROLL FOR NEXT