नागपूर : हिंदी महासागराच्या पृष्ठभागाच्या तापमानात १९५१ ते २०१५ या कालावधीत सरासरी १ अंशाने वाढ झाली आहे. तुलनेत जागतिक पातळीवर ०.०७ अंश वाढीची नोंद झाली आहे. आगामी काळातही हिंदी महासागराचे तापमान वाढणार असल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळे भारताला विविध नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागेल, असे जाणकारांचे म्हणणे आहे.
वसुंधरा विज्ञान मंत्रालयाने याविषयी नुकताच 'अॅसेसमेंट ओव्हर क्लायमेट चेंज ओव्हर द इंडियन रिजन' हा अहवाल सादर केला होता. भारताचे तापमान वाढत असून देशाभोवती असलेल्या समुद्राच्या तापमानातही वाढ होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. 'सेंटर फॉर एनर्जी, एन्व्हायर्न्मेंट अँड सायन्स' या संस्थेनेही याविषयी अहवाल प्रसिद्ध केला आहे. समुद्राच्या तापमान वाढीचा आणि हवामान बदलांचा मानव, प्राणी, निसर्ग, शेती आणि जैव विविधतेवर काय परिणाम होणार?, कोणत्या धोक्यांना सामोरे जावे लागणार यासंदर्भात विविध बाबी स्पष्ट करण्यात आल्या आहेत.
पाऊस -
१९५१-२०१५ वर्षांत मॉन्सूनमध्ये ६ टक्क्यांनी घट
दुष्काळ
१५ वर्षांत ७९ जिल्ह्यांमध्ये दरवर्षी भयंकर दुष्काळ. तसेच दुष्काळी क्षेत्रात दशकनिहाय १.३ टक्क्यांनी वाढ होत आहे
वैचित्र्य -
उष्ण दिवस, थंड रात्री
सन १९८६ ते २०१५ या कालावधीत सर्वात उष्ण दिवस आणि सर्वात थंड रात्रीचे तापमान अनुक्रमे ०.६३ आणि ०.४ अंशांनी वाढले आहे. चालु शतकाच्या अखेरीस ते ४.७ आणि ५.५ अंशांपर्यंत वाढण्याचे संशोधकांचे मत आहे.
कीड, कीटकांचा प्रादुर्भाव
तापमानवाढीमुळे कीड, कीटकांचा प्रादुर्भाव वाढणार असून पिकांच्या उत्पादकतेवरही प्रतिकूल परिणाम होणार असल्याचा इशारा या अहवालांमध्ये देण्यात आला आहे.
नैसर्गिक आपत्तीच्या घटना
वर्ष | घटना (दुष्काळ, पूर, चक्रीवादळे) |
१९७० ते २००५ | २५० घटना |
२००५ ते २०२० | ३१० घटना |
संपादन - भाग्यश्री राऊत
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.