बंगळुरू : मंगळुरूजवळील एका जुन्या मशिदीच्या खाली हिंदू मंदिरांसारखी स्थापत्या रचना सापडली (Temple Structure Found Under Mosque) आहे. गंजीमठ ग्रामपंचायत हद्दीत मलाली मार्केट मशिदीच्या आवारात ही रचना सापडली असल्याचे अहवालात म्हटले आहे. याबाबत एएनआयने वृत्त दिलं आहे.
मंगळुरूच्या बाहेरील मलाली येथील जुमा मशिदीचा काही भाग पाडून नूतनीकरणाचे काम सुरू आहे. यावेळी गुरुवारी मध्यरात्रीच्या सुमारास हा शोध लागला. त्यानंतर ही घटना काही क्षणातच व्हायरल झाली. त्यानंतर हिंदूत्ववादी संघटनांनी या मशिदीकडे धाव घेतली. त्यांनी अधिकाऱ्यांना कागदपत्रांची पडताळणी करण्याची विनंती केली. तसेच याठिकाणी कुठलीही अनुचित घटना घडू नये म्हणून पोलिसांनी लोकांना घटनास्थळावर प्रवेश नाकारला. या ठिकाणी हिंदू मंदिर असण्याची शक्यता आहे, असे लोक सुचवत असताना, विश्व हिंदू परिषदेच्या (व्हीएचपी) नेत्यांनी पुढे येऊन कागदपत्रांची पडताळणी होईपर्यंत काम थांबवण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाला केले आहे.
दरम्यान, दक्षिण कन्नड आयुक्तालयाने पुढील आदेशापर्यंत संरचनेची स्थिती कायम ठेवण्याचे आदेश दिले आहेत. अधिकारी जमिनीच्या नोंदी देखील पाहत आहेत आणि लोकांना कागदपत्र पडताळणी दरम्यान शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. मला या समस्येबद्दल क्षेत्रीय अधिकारी आणि पोलिस विभागाकडून माहिती मिळाली आहे. जिल्हा प्रशासन जुन्या जमिनीच्या नोंदी आणि मालकी तपशीलाच्या नोंदी तपासत आहे. आम्ही एंडोमेंट विभाग आणि वक्फ बोर्ड या दोघांकडूनही अहवाल घेऊ, असे दक्षिण कन्नडचे उपायुक्त राजेंद्र केव्ही यांनी एएनआयसोबत बोलताना सांगितले. आम्ही दाव्यांची वैधता तपासू आणि लवकरच योग्य निर्णय घेऊ. तोपर्यंत मी खोदकाम जैसे थे ठेवण्याच्या सूचना केल्या आहेत आणि लोकांना विनंती केली आहे की त्यांनी निष्कर्ष काढू नये. मी लोकांना कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता राखण्याची विनंती करत आहे, असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.