अयोध्या : उत्तरप्रदेशातील (Uttar Pradesh) मंदिरांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अयोध्येमध्ये स्थानिक मुस्लिमांना विकास आणि रोजगार या दोनच गोष्टी महत्त्वाच्या वाटतात. राम मंदिराचा मुद्दा आता मागे पडला असून राजकीय पक्षांनी आता लोकांच्या विकासावर लक्ष केंद्रित करावे अशी येथील स्थानिकांची भावना आहे. आज अयोध्येमध्ये हिंदू आणि मुस्लिम दोघेही गुण्यागोविंदाने नांदत आहेत पण जिल्ह्यामध्ये चांगले रस्ते, पार्किंगची सोय आणि कारखाने असावेत, अशी अपेक्षा रामजन्मभूमी आणि बाबरी मशीद वादातील सर्वांत जुने प्रतिवादी मोहमंद हाशीम अन्सारी यांचे चिरंजीव इक्बाल अन्सारी (Iqubal Ansari) यांनी व्यक्त केली. (Temple mosque dispute in Ayodhya disoved Muslims want development and employment)
अयोध्येमध्ये हजारो मंदिरे आहेत त्यात आता फक्त राममंदिराची भर पडली आहे, असे मत मांडताना ते तरुणांना आज रोजगार हवा आहे कारण अयोध्या आज जिल्हा झाला असल्याचे आग्रहपूर्वक सांगतात. अयोध्येतील मंदिर आणि मशीद हा वाद संपला आहे. मुस्लिमांनी न्यायालयाच्या निकालाला विरोध केलेला नसून त्याचा निर्धारपूर्वक स्वीकार केला आहे पण ही वेळ रोजगार आणि विकासाची असल्याचे त्यांनी नमूद केले.
यंदा बदल होणार?
अयोध्या खटल्यातील अन्य एक प्रतिवादी हाजी मेहबूब (वय ७६) काहीसा वेगळा दावा करतात. सरकारने कोणतेही गाणे गाऊ द्या राज्यात यंदा सरकार बदलेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यंदा अयोध्येतून समाजवादी पक्षाचा उमेदवार विजयी होईल असा दावाही करायलाही ते विसरत नाहीत. कोरोनाच्या काळामध्ये मध्यमवर्गाला मोठा फटका बसला पण सरकारने त्यांच्यासाठीच काहीच केले नाही अशी खंत हमीद जफर मिसाम व्यक्त करतात.
मुस्लिम कायम धर्मनिरपेक्षतेच्या बाजूनं उभे
इक्बाल अन्सारी म्हणाले, योगी आदित्यनाथ यांनी ‘यूपी’ला दंगलमुक्त राज्य बनविले असून मागील पाच वर्षांमध्ये राज्यात एकही दंगल झालेली नाही. खालिक अहमद खान म्हणाले, मुस्लिम आतापर्यंत धर्मनिरपेक्ष विचाराच्या पक्षांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. अयोध्येत न्यायालयाच्या आदेशानुसार मंदिर उभे राहिले असून त्या निवाड्याचा सर्वांनीच स्वीकार केला आहे. आमचा कोणत्याच पक्षाला विरोध नसून आम्ही धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे आहोत.
कशी आहे अयोध्येची रचना?
२०११ साली करण्यात आलेल्या जनगणनेनुसार अयोध्येमध्ये हिंदू बहुसंख्य आहेत. येथे ८४.७५ टक्के हिंदू असून १४.८० टक्के मुस्लिम आहेत. अयोध्येमध्ये पाचव्या टप्प्यात २७ फेब्रुवारी रोजी मतदान होईल. या जिल्ह्यात पाच विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून त्या सर्वच ठिकाणांवर भाजपचे उमेदवार विजयी झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.