नवी दिल्ली - तिहार कारागृहातही कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) पसरला असून तेथील परिस्थिती हाताळण्यात तुरुंग प्रशासनाला (Jail Administrative) मदत (Help) करण्याची इच्छा ‘अल कायदा’ या दहशतवादी (Terrorist) शबील अहमद (Shabil Ahmad) याने व्यक्त केली आहे. तो पेशाने डॉक्टर (Doctor) आहे. कोरोनाकाळात मदत करण्यास परवानगी (Permission) देण्यासाठी त्याने दिल्ली उच्च न्यायालयात (High Court) अर्ज केला आहे. (Terrorist Doctor Says I also Want to Help in the Corona Period)
विशेष न्यायाधीश धर्मेंद्र राणा यांच्या न्यायालयात या अर्जावर बुधवारी (ता. १२) सुनावणी झाली. वैद्यकीय व्यावसायिक म्हणून त्याचा अनुभव आणि कौशल्य याचा उपयोग तिहारमध्ये पसरलेला कोरोना आणि कोरोनाबाधित कैद्यांवरील उपचारासाठी होऊ शकेल, असे त्याने न्यायालयात म्हटले आहे. शबील हा एमबीबीएस डॉक्टर असून गंभीर आजारावर उपचार करण्याचा त्याला सात वर्षांचा अनुभव आहे.
‘अल कायदा’चे काम करीत असलेल्या शबील अहमदला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने २२ फेब्रुवारीला अटक केली. ‘अल कायदा’च्या भारतातील आणि विदेशातील अन्य सदस्यांना अर्थ व अन्य मदत पुरवीत असल्याचा आरोप त्याच्यावर आहे. तसेच ब्रिटनमधील ग्लास्गो विमानतळावर ३० जून २००७ रोजी झालेल्या आत्मघाती दहशतवादी हल्ल्यातील तो आरोपी आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.