Terrorists found 'Ultra set in j and k sakal
देश

Terrorists found 'Ultra set in j and k : दहशतवाद्यांकडे आढळले ‘अल्ट्रा सेट’;जम्मू-काश्‍मीरमधील कारवाईतून उघड,पाकिस्तानी सैन्यदलांचा सहभाग स्पष्ट

सकाळ वृत्तसेवा

श्रीनगर : जम्मू-काश्‍मीरमध्ये मागील काही दिवसांत दहशतवाद्यांबरोबर झालेल्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी अनेक शस्त्र आणि इलेक्ट्रॉनिक यंत्रे हस्तगत केली आहेत. या यंत्रांमध्ये एक अत्यंत उच्च तंत्रज्ञानाचा वापर असलेल्या चिनी बनावटीच्या ‘अल्ट्रा सेट’चा समावेश आहे. पाकिस्तानी सैन्याकडून वापरले जाणारे हे हँडसेट दहशतवाद्यांकडे आढळल्याने पाकिस्तानी सैन्य आणि दहशतवादी यांच्यातील संबंध पुन्हा एकदा समोर आल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

सुरक्षा दलांनी घुसखोरी केलेल्या पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून मोबाईल हँडसेट हस्तगत करण्यात आले आहेत. त्यांची तपासणी केली असता दहशतवाद्यांना पाकिस्तानी सैनिकांकडून प्रशिक्षण, शस्त्रे आणि दारुगोळा यांची मदत होत असल्याचे स्पष्ट होत असल्याचे भारतीय अधिकाऱ्यांनी सांगितले. हस्तगत करण्यात आलेले मोबाईल हँडसेट हे चीनमधील टेलिकॉम कंपन्यांनी पाकिस्तानी सैन्यासाठी तयार केले आहेत. मागील वर्षी जुलैमध्ये पूँच येथे झालेल्या चकमकीनंतर असे काही हँडसेट जवानांच्या हाती लागले होते.

चीनकडून वाढती मदत

पाकिस्तानी सैन्याची क्षमता वाढविण्यासाठी चीनकडून त्यांना विविध मार्गांनी मदत केली जात आहे. यामध्ये पोलादी झाकण असलेले बंकर, ड्रोनचा पुरवठा, उच्च तंत्रज्ञान असलेले मनोरे, भूमिगत फायबर केबलचे जाळे, अनेक पायाभूत सुविधांची उभारणी याचा समावेश आहे. चीनने पाकिस्तानला अत्याधुनिक रडारही पुरविले आहे. याशिवाय विविध प्रकारच्या शस्त्रांचा आणि उपकरणांचाही पुरवठा पाकिस्तानला केला जात आहे.

‘अल्ट्रा सेट’ म्हणजे काय?

‘अल्ट्रा सेट’ हँडसेटचा वापर नेहमीच्या मोबाईल हँडसेटप्रमाणे करता येतो. मात्र त्याबरोबरच, ‘ग्लोबल सिस्टीम फॉर मोबाईल’ (जीएसएम) किंवा कोड-डिव्हिजन मल्टिपल ॲक्सेस (सीडीएमए) या सहसा वापरल्या जाणाऱ्या मोबाईल तंत्रज्ञानावर अवलंबून न राहता त्यामध्ये विशेष रेडिओ क्षमताही त्यामध्ये असते. हे यंत्र संदेशवहनासाठी रेडिओ तरंगांचा वापर करते. प्रत्येक यंत्र हे पाकिस्तानमधील एका नियंत्रण कक्षाशी जोडले गेले असल्याचे आढळून आले आहे. विशेष म्हणजे, चिनी उपग्रहांच्या माध्यमातून संदेशाची देवाणघेवाण होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Eknath Shinde: मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र, खासदार श्रीकांत शिंदेंनी महाकाल मंदिराचे नियम मोडले; मंदिराच्या गर्भगृहात केला प्रवेश

Chh.Sambhajinagar Assembly Election 2024 : विस्तारित भागांना प्रतीक्षा सुविधांची!

एसी जिममध्ये घाम गाळणाऱ्यांना गश्मीर महाजनीने दिला खास सल्ला; म्हणाला- एका चुकीच्या इन्स्ट्रक्टरमुळे मी...

Latest Maharashtra News Updates : महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने मुख्य निवडणूक अधिकारी एस चोक्कलिंगम यांची भेट घेतली

High Court : कब्रस्थान, दफनभूमीची जागा वापरता येईल? रेल्वे उड्डाणपूल प्रकरणी उच्च न्यायालयाची विचारणा

SCROLL FOR NEXT