Testing options for second Mars mission isro researcher M Sankaran information sakal
देश

ISRO : दुसऱ्या मंगळ मोहिमेसाठी पर्यायांची चाचपणी; एम. शंकरन यांची माहिती

‘भारतीय अंतराळ संशोधन संस्थे’चे संशोधक एम. शंकरन यांची माहिती

सकाळ वृत्तसेवा

बंगळूर : भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) मंगळावरील दुसऱ्या मोहिमेची तयारी करत असून या मोहिमेसाठी बाजारात उपलब्ध पर्यायांची चाचपणी करत आहे, अशी माहिती इस्रोच्या वरिष्ठ संशोधकाने आज दिली.

इस्रो’च्या या आगामी मंगळ मोहिमेतून अधिक वैज्ञानिक निष्कर्ष अपेक्षित असून ती मोठीही असणे आवश्यक आहे, असे इस्रोच्या यूआर राव उपग्रह केंद्राचे संचालक एम. शंकरन यांनी ‘पीटीआय’शी बोलताना सांगितले. ते पुढे म्हणाले, की इस्रोच्या मंगळावरील नवीन मोहिमेबद्दल सांगायचे झाल्यास ही मोहीम अजूनही अभ्यासाच्या टप्प्यावर आहे.

इस्रोकडून मोहिमेचा अभ्यास करण्यात येत आहे. ही मोहीम हाती घेण्यासाठी आम्ही विविध पर्याय तपासून पाहत आहोत. इस्रोच्या यापूर्वीच्या मंगळयान मोहिमेच्या तुलनेत या आगामी अधिक मोठ्या मोहिमेतून संस्थेला अधिक चांगले वैज्ञानिक निष्कर्ष अपेक्षित आहेत, असेही त्यांनी नमूद केले.

भारताने ५ नोव्हेंबर २०१३ रोजी मंगळयानाचे यशस्वी प्रक्षेपण केले होते. या मोहिमेतंर्गत इस्रोने प्रक्षेपित केलेल्या मंगळयानाने २४ सप्टेंबर २०१४ पासून मंगळाभोवती प्रदक्षिणा घालण्यास सुरूवात केली होती. त्यानंतर ऑक्टोबर २०२२ मध्ये मंगळयानाचा संपर्क तुटल्यानंतर इस्रोची मंगळयान-१ ही मोहीम संपुष्टात आली होती.

चांद्रयान-३ या मोहिमेबद्दल बोलताना शंकरन म्हणाले, की चांद्रयान प्रक्षेपण होण्याच्या श्रीहरिकोटा बंदरावर यापूर्वीच पोचले असून श्रीहरीकोटात तयारी सुरू आहे. साधारणपणे जुलै महिन्यात चांद्रयानाचे प्रक्षेपण होणे अपेक्षित आहे. अंतराळ वैज्ञानिकांच्या सल्ल्यानुसार या मोहिमेची प्रत्येक बाजू तपासण्यात आली आहे.

विशेषत: इस्रोने चांद्रयान -२ मोहिमेतून घेतलेल्या अनुभवातून ही तपासणी करण्यात आली. चांद्रयान-३ मोहिमेसाठी शक्य ती सर्व काळजी घेण्यात आली आहे. त्यामुळे, या मोहिमेसाठीही इस्रो उत्साही आहे, असेही त्यांनी सांगितले.

गगनयान मोहिमेचीही जय्यत तयारी

इस्रोच्या गगनयान मोहिमेबद्दल बोलताना शंकरन म्हणाले, की ही इस्रोची अत्यंत महत्त्वाकांक्षी मोहीम आहे. या मोहिमेमुळे इस्रोकडून अनेक नव्या गोष्टी केल्या जात आहेत. अनेक गोष्टींबरोबर अनेक चाचण्याही घेतल्या जात आहेत. त्या सर्वसामान्य जनतेला पाहता येत नाहीत. मात्र, या मोहिमेसाठी बरेच काम सुरू आहे. या वर्षी जनतेला यातील काही गोष्टी पाहता येतील, अशी अपेक्षा आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर, 'या' ६५ नेत्यांच्या नावांचा समावेश

Maharashtra Vidhan Sabha: दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना अन् दोन राष्ट्रीय पक्ष; महाराष्ट्रात जागा वाटपात कोणाचा फायदा? कोणाचं नुकसान?

Bhushan Pradhan & Anusha Dandekar : "दादा-वहिनी" भूषण-अनुषाच्या व्हायरल व्हिडिओवर चाहत्यांच्या कमेंट्स ; डेटिंगची रंगली चर्चा

Ulhasnagar News : कॉलेज, डॉक्टरांवर निवडणूक जनजागृतीची जबाबदारी; मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी महानगरपालिकेने कसली कंबर

Vikramgad Assembly Assembly Election 2024 : मोखाड्यात भाजप मध्ये इनकमिंग सुरू

SCROLL FOR NEXT