arvind kejariwal. 
देश

अरविंद केजरीवाल तुरुंगात गेल्यास काय? आपने आखली पुढची रणनीती

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- सक्तवसुली संचालनालयाने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना समन्स पाठवला असून चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. याप्रकरणी त्यांना अटक होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. आम आदमी पक्षाकडून यावर प्रतिक्रिया देण्यात आलीये. अरविंद केजरीवाल हे जर तुरुंगात गेले तर ते तेथूनच दिल्लीचे सरकार चालवतील असं आपने म्हटलं आहे.

दिल्ली मद्य पॉलिसी प्रकरणात अरविंद केजरीवाल यांना ईडीने समन्स बजावला आहे. ईडीने त्यांना २ नोव्हेंबर रोजी हजर राहण्याचे आदेश दिले होते. पण, त्यांनी गैरहजर राहत इतर राज्यात प्रचारासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. आपने आरोप केलाय की, केजरीवाल यांच्याविरोधात मोठं कारस्थान रचलं जात आहे. त्यांना तुरुंगात टाकण्याची मोदी सरकारची योजना आहे.

आज सायंकाळी आपच्या आमदारांची बैठक अरविंद केजरीवाल यांनी बोलावली होती. यावेळी झालेल्या चर्चेची माहिती देताना मंत्री अतिशी म्हणाल्या की, संपूर्ण कायदेमंडळाने असा निर्णय घेतलाय की ईडीने समन्स पाठवला असला तरी केजरीवाल यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देऊ नये.

आम्ही त्यांना सांगितलं की, दिल्लीच्या लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे त्यामुळे राजीनामा देऊ नका, जरी ते तुरुंगात गेले, तरी केजरीवाल हेच दिल्लीचे मुख्यमंत्री असतील. आम्ही कोर्टाला विनंती करु की त्यांनी कॅबिनेट बैठक तुरुंगात घेऊ द्यावी, असं आतिशी म्हणाल्या आहेत.

मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडीने केजरीवाल यांना समन्य बजावलाय. ईडीची कारवाई चुकीची आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं म्हणत केजरीवाल यांनी चौकशीसाठी जाणे टाळलं होतं. भाजपच्या विनंतीवरुनच हा समन्स पाठवण्यात आल्याचा दावा त्यांनी केला होता. दरम्यान, याच प्रकरणामध्ये माजी उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया आणि आपचे राज्यसभेचे खासदार संजय सिंग तुरुंगात आहेत. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sada Sarvankar: सदा सरवणकर आज काय निर्णय घेणार? मध्यरात्री 'वर्षा' बंगल्यावर तासभर खलबतं

सोलापूर जिल्ह्यातील भाजप उमेदवारांच्या सभांसाठी ‘हे’ नेते फायनल! पंढरपूर, अक्कलकोट, माळशिरस, सोलापूर शहरात सभांचे नियोजन

Sakal Podcast: राज्यात हेलिकॉप्टर रुग्णवाहिका सेवा उपलब्ध होणार ते रिटेंशनमध्ये विराट कोहली सर्वात महागडा भारतीय खेळाडू

Latest Marathi News Updates : महाराष्ट्रासह केरळ, तामिळनाडू राज्यात आज पावसाची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज

कोरोनातील 170 कोटींचे ऑक्सिजन प्लांट धुळखात! देखभाल दुरुस्तीसाठी तज्ज्ञ पण नाहीत अन्‌ निधीही नाही; ‘पीएसए’ प्लांटच्या ठिकाणी आता बॉटलिंगचा प्रस्ताव

SCROLL FOR NEXT