Supreme Court eSakal
देश

उदयनिधी, ए. राजा यांच्या सनातन धर्मावरील वादग्रस्त विधानांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात; आता...

रवींद्र देशमुख

नवी दिल्ली : तामिळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन आणि खासदार ए राजा यांनी सनातन धर्मावर केलेल्या वादग्रस्त विधानांचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. या दोघांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषण प्रकरणी न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.

उदयनिधी स्टॅलिन आणि खासदार ए राजा यांच्यावर एफआयआर नोंदवून कारवाई करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. याशिवाय दिल्ली आणि चेन्नईच्या पोलीस आयुक्तांवरही अवमानाच्या कारवाईची मागणी करण्यात आली आहे. अधिवक्ता विनीत जिंदाल यांनी सनातन धर्माविरोधात द्वेषयुक्त भाषण केल्याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात ही याचिका दाखल केली आहे.

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचा मुलगा उदयनिधी स्टॅलिन यांनी 2 सप्टेंबर रोजी चेन्नई येथे सनातन निर्मूलन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. तेथील भाषणादरम्यान त्यांनी सनातन धर्माची तुलना डेंग्यू, मलेरिया आणि कोरोनाशी केली होती. उदयनिधी म्हणाले - "जसे मलेरिया आणि कोरोनाचे निर्मूलन करणे आवश्यक आहे, त्याचप्रमाणे सनातनचे देखील निर्मूलन करणे आवश्यक आहे. उदयनिधी यांच्या विधानावर मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

दुसरीकडे, काँग्रेसने गुरुवारी सांगितले की ते द्रविड मुन्नेत्र कळघम (डीएमके) नेते उदयनिधी स्टॅलिन आणि ए राजा यांच्या 'सनातन धर्म'वरील टिप्पण्यांशी आम्ही सहमत नाही. सर्वधर्म समभावावर (सर्व धर्मांचा आदर) आमचा विश्वास असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. भाजप या संपूर्ण प्रकरणावर आक्रमक असून त्यांचे सर्व नेते द्रमुकसह इंडिया आघाडीवर हल्लाबोल करत आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Adani Group: अदानी 6 हजार कोटींना विकत घेणार 90 वर्षे जुनी कंपनी, काय आहे खास ?

IND vs BAN 1st Test : Jasprit Bumrah चा चेंडू सोडण्याची चूक अन् बांगलादेशी फलंदाजाची दांडी गुल; रचले गेले ५ मोठे विक्रम

Kashedi Ghat : मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटातील एक भुयारी मार्ग आजपासून बंद; काय आहे कारण?

CM Eknath Shinde : "सीएम साहेबांचा दरवाजा बंद ? " मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेने चक्क आमदाराला नाकारला प्रवेश !

India Economy : भारत २०३१ पर्यंत तिसरी अर्थव्यवस्था; ‘एस अँड पी’चा अहवाल

SCROLL FOR NEXT