बंगळूर : कोरोनाच्या (CoronaVirus) दुसऱ्या लाटेचा सर्वाधिक फटका बसलेल्या राज्यांमध्ये कर्नाटकनेही (Karnataka) लॉकडाउन वाढविण्याचे जवळपास निश्चित केले आहे. महसूल मंत्री आर. अशोक यांनी शुक्रवारी तसे स्पष्ट संकेत दिले. अशोक हे राज्य आपत्ती निवारण प्राधिकरणाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांनी सांगितले की, लॉकडाउन (Lockdown) आणखी काही दिवस कायम ठेवणे हिताचे ठरेल असे बंगळूरचा एक नागरिक म्हणून माझे वैयक्तिक मत आहे. रोजच्या नव्या रुग्णांचा आकडा २२ हजारवरून सात हजरांनी कमी होऊन १५ हजारपर्यंत आला आहे. काही ठिकाणी अंशतः लॉकडाउन आणि काही ठिकाणी पूर्ण लॉकडाउनमुळे हे शक्य झाले आहे. दीर्घ लॉकडाउन लावलेले महाराष्ट्र, दिल्लीसारखी राज्ये आमच्यासाठी मॉडेल आहेत. सध्याचे निर्बंध २४ मे पर्यंत लागू आहेत. त्यास तीन दिवस बाकी असताना अंतिम निर्णय मुख्यमंत्री बी. एस. येडीयुरप्पा घेतील. ते आढावा बैठक घेतील. त्यात आम्ही आमची मते मांडू. त्यादिवशीची रुग्णसंख्या पाहिली जाईल. ती कमी झाली आहे का यानुसार निर्णय होईल, असेही अशोक यांनी नमूद केले. (The Corona situation is dire in neighboring Karnataka lockdown will be Increased)
- ३१ पैकी २९ जिल्ह्यांत संसर्गाचा दर (पॉझिटीव्हीटी रेट) : १० टक्क्यांपेक्षा जास्त
- गुरुवारअखेरीस राज्यातील हा दर : २७.६४ टक्के
- मृत्युचा दर : ०.९७ टक्के
- गुरुवारी नवे रुग्ण : ३५,२९७ (एकूण २०,८८,४८८) मृत्यू : ३४४ (२०,७१२)
- उपचार सुरु असलेले रुग्ण : ५,९३,०७८
- गुरुवारी बंगळूर शहर विभागातील रुग्णसंख्या : १५,१९१
गेल्या 24 तासात भारतात 4000 जणांना प्राण लागले आहेत. गुरुवारी दिवसभरात देशात 3 लाख 43 हजार 144 नवीन रुग्ण सापडले असून 3 लाख 44 हजार 776 जण कोरोनामुक्त झाल्याची माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिली आहे. आतापर्यंत भारतात 2 कोटी 40 लाख 46 हजार 809 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यापैकी 2 कोटी 79 हजार 599 जण कोरोनामुक्त झाले असून 2 लाख 62 हजार 317 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.देशात सध्या 37 लाख 4 हजार 893 सक्रीय रुग्ण आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.