PLANE CRASH ESAKAL
देश

हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये देशाने आतापर्यंत गमावलेत अनेक दिग्गज

हेलिकॉप्टर दुर्घटनांमध्ये CDS जनरल बिपीन रावत यांच्या निधन झालं. यापूर्वीही अनेक दिग्गजांना विमान दुर्घटनेत प्राण गमवावा लागला होता.

सकाळ डिजिटल टीम

चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (Chief of Defense Staff) जनरल बिपीन रावत (Bipin Rawat) यांना हॅलिकॉप्टर दुर्घटनेत (Helicopter crash) आपला प्राण गमवावा लागला. या दुर्घटनेसारख्या अनेक दुर्घटना यापूर्वी घडल्या असून त्यात अनेक महत्त्वाच्या व्यक्तींना आपलं प्राण गमवावा लागला आहे. CDS जनरल बिपीन रावत यांच्या हेलिकॉप्टरला झालेल्या दुर्घटनेनं अनेक कटू आठवणी पुन्हा ताज्या झाल्या आहेत. भारतीय राजकारणी वायएस राजशेखर रेड्डी, संजय गांधी, माधव राव सिंधिया, जीएमसी बाल योगी, एस मोहन कुमारमंगलम, ओपी जिंदाल, अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री दोरजी खांडू हे सुद्धा विमान अपघाताचे बळी ठरले आहेत. त्या दुर्घटनांबद्दल जाणून घेऊया.

1. जनरल विक्रम सिंह आणि एअर व्हाइस मार्शल एर्लिक पिंटो (General Vikram Singh and Air Vice Marshal Erlik Pinto)- 23 नोव्हेंबर 1963 रोजी जम्मू-काश्मीरमधील पुंछ येथे भारतीय हवाई दलाचे (Indian Air Force) विमान कोसळले. यामध्ये हवाई दलातील 6 अधिकाऱ्यांना आपला जीव गमवावा लागला. ज्यात लेफ्टनंट जनरल विक्रम सिंह आणि एअर व्हाइस मार्शल एर्लिक पिंटो शहीद झाले.

2. मोहन कुमार मंगलम (Mohan Kumar Mangalam)- 31 मे 1973 रोजी काँग्रेस नेते मोहन कुमार मंगलम यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. इंडियन एअरलाइन्स 440 नावाच्या विमानात ते प्रवास करत होते. त्यांच्याकडील पार्कर पेनवरून त्यांच्या मृतदेहाची ओळख पटली.

3. संजय गांधी (Sanjay Gandhi)- 23 जून 1980 रोजी भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी (Indira Gandhi) यांचे पुत्र संजय गांधी (Sanjay Gandhi) यांचाही विमान अपघातात (Flight crash) मृत्यू झाला. नवी दिल्लीतील सफदरजंग विमानतळाजवळ त्यांचा मृत्यू झाला. संजय गांधी चांगले पायलट होती आणि ज्यावेळी ही दुर्घटना घडली त्यावेळी ते स्वतःच खाजगी विमान चालवत होते.

4. नातुंग (Natung)- 2001 साली झालेल्या हेलिकॉप्टर अपघातात अरुणाचल प्रदेशचे शिक्षण मंत्री नातुंग ठार झाले.

5. माधवराव सिंधिया (Madhavrav Sindhia)- 30 सप्टेंबर 2001 रोजी प्रसिद्ध काँग्रेस नेते माधवराव सिंधिया यांचाही उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यात विमान अपघातात मृत्यू झाला. दुर्घटनाग्रस्त 10 आसनी खाजगी विमानात त्यांच्यासोबत 4 पत्रकारांचाही समावेश होता. अतिवृष्टी तसेच खराब दृश्यमानतेमुळे मोटा गावातील एका भातशेतीत ही दुर्घटना घडली होती.

6. GMC बालयोगी (GMC Balyogi)- 3 मार्च 2002 रोजी लोकसभा (loksabha) अध्यक्ष आणि तेलुगु देसम पक्षाचे (Telugu Desam Party) नेते GMC बालयोगी यांचाही आंध्र प्रदेशात हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला होता. बालयोगी बेल 206 नावाच्या हेलिकॉप्टरमध्ये होते. खराब दृश्यमानतेमुळे ही दुर्घटना घडली होती.

7. सी संगमा (C Sangma)- सप्टेंबर 2004 मध्ये केंद्रीय मंत्री आणि मेघालयचे समुदाय विकास मंत्री सी संगमा यांचाही हेलिकॉप्टर दुर्घटनेत मृत्यू झाला. संगमा पवन हंस नावाच्या हेलिकॉप्टरने गुवाहाटीहून शिलाँगला जात होते.

8. ओपी जिंदाल (OP Jundal)- 31 मार्च 2005 रोजी हरियाणाचे ऊर्जा मंत्री ओपी जिंदाल यांचाही विमान अपघातात मृत्यू झाला. विमानात काही तांत्रिक बिघाडामुळे ते उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथे कोसळले.

9. वायएस राजशेखर रेड्डी (YS Rajasekhara Reddy)- 3 सप्टेंबर 2009 रोजी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री वायएस राजशेखर रेड्डी यांचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले. घटनेच्या वेळी रेड्डी यांचे हेलिकॉप्टर चित्तूर जिल्ह्यातील जंगलातून जात होते. रेड्डी ज्या हेलिकॉप्टरमध्ये होते त्याचे नाव बेल 430 असे होते. अमेरिकन तंत्रज्ञानावर आधारित हे डबल इंजिन हेलिकॉप्टर होते. वायएसआर यांचा मृतदेह 27 तासांनंतर सापडला.

10. नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose)- भारतीय स्वातंत्र्यसंग्रामात महत्त्वाची भुमिका बजावणारे नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा मृत्यूही विमान दुर्घटनेत झाल्याचं मानलं जाते. त्यांचे विमान 18 ऑगस्ट 1945 रोजी क्रॅश झाले होते. परंतु याबाबत अजूनही तर्क वितर्क लढवले जातात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Share Market Closing: सेन्सेक्स-निफ्टी घसरणीसह बंद; निफ्टी बँकेत तेजी, कोणते शेअर्स तेजीत?

IND vs AUS : विराट कोहलीला खुणावतोय राहुल द्रविडचा विक्रम; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर हव्यात फक्त १०२ धावा

तर 'कुछ कुछ होता हैं' मध्ये राणी मुखर्जी ऐवजी दिसली असती ऐश्वर्या राय; 'या' कारणामुळे दिलेला नकार, म्हणालेली-

Stock Market: कोण आहेत FPI आणि FII? त्यांच्यामुळे शेअर बाजार कोसळतो अन् तेजीत येतो?

महाराष्ट्रात गलिच्छ राजकारण सुरू, 'अदृश्य' शक्तीने कारस्थान रचून दोन पक्ष फोडले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्ला

SCROLL FOR NEXT