omicron and delta varient  e sakal
देश

ओमिक्रॉनला रोखू शकत नाही! केरळच्या कोविडतज्ज्ञांनी केले हात वर

ओमिक्रॉनला रोखू शकत नाही! केरळच्या कोविडतज्ज्ञ डॉक्‍टरांनी केले हात वर

सकाळ वृत्तसेवा

केरळमध्ये कोविड-19 संसर्गावर स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीच्या डॉक्‍टरांनी ही माहिती दिली आहे.

कोरोना (Covid-19) विषाणूच्या नव्या ओमिक्रॉन (Omicron) व्हेरिएंटचा वाढता संसर्ग थांबवता येत नाही. केरळमध्ये (Kerala) कोविड-19 संसर्गावर स्थापन करण्यात आलेल्या तज्ज्ञांच्या समितीच्या डॉक्‍टरांनी (Doctors) ही माहिती दिली आहे. समितीचे सदस्य डी. एस. अनिस (D. S. Anis)) यांनीही सांगितले की, नवीन व्हेरिएंटची प्रकरणे दर दोन दिवसांनी दुप्पट होत आहेत. (The Covid expert doctors said that the Omicron variant cannot be stopped)

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना डॉ. अनिस म्हणाले, ग्लोबल ट्रेंड (Global Trend) दर्शवितो की ओमिक्रॉनची प्रकरणे 2-3 आठवड्यात 1000 पर्यंत पोहोचत आहेत आणि 2 महिन्यांत 1 दशलक्षपर्यंत पोहोचू शकतात. भारतात (India) या संसर्गाचा स्फोट थांबवण्यासाठी आपल्याकडे एका महिन्यापेक्षा जास्त वेळ नाही. आपल्याला ओमिक्रॉनला थांबवावे लागेल. देशातील बहुतांश प्रकरणे स्थलांतरित व्यक्तींशी संबंधित असल्याचेही ते म्हणाले.

समितीच्या डॉक्‍टरांनी इशारा दिला की, आम्ही भारतात संसर्गाचा प्रसार रोखू शकत नाही. आमच्याकडे आमची प्रणाली पुन्हा सक्रिय करण्यासाठी 1 महिना आहे; जेणेकरून परिस्थिती सुधारू शकेल. ते म्हणाले की, आम्ही आमची यंत्रणा वेळेवर वापरली तरी भारतासारख्या देशात ओमिक्रॉनचा संसर्ग वाढण्याची शक्‍यता खूप प्रबळ आहे. केरळमध्ये आतापर्यंत Omicron चे 35 हून अधिक प्रकरणे समोर आली आहेत.

भारतातील Omicron व्हेरिएंटने केंद्र आणि विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेश सरकारांची चिंता वाढवली आहे. आतापर्यंत देशातील 15 हून अधिक राज्यांमध्ये या व्हेरिएंटची प्रकरणे आढळून आली आहेत. अनेक राज्यांमध्ये ओमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता, निर्बंध देखील पुन्हा येऊ लागले आहेत. देशातील जनतेला बूस्टर डोस (Booster Vaccine) देण्यासाठी केंद्र सरकारनेही (Central Government) विचारमंथन सुरू केले आहे. ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्‍नॉलॉजी इन्स्टिट्यूटला (Institute of Translational Health Sciences and Technology) बूस्टर डोस देण्याबाबत अभ्यास करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. या अंतर्गत, सुरुवातीला सुमारे 3000 लोकांना बूस्टर डोस देऊन, देशातील लोकांना अतिरिक्त लसीची गरज आहे की नाही यावर संशोधन केले जाणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : राहुल गांधी आणि नाना पटोले प्रचाराचा नारळ फोडणार

SCROLL FOR NEXT