Jaish e Mohammed Esakal
देश

Jaish e Mohammed: जैश ए मोहम्मदच्या दहशतवाद्यांना जन्मठेपेच्या शिक्षेतून सूट, निकाल देताना दिला रशियन लेखकाचा दाखला

Delhi High Court: बिलाल अहमद मीर, सज्जाद अहमद खान, मुझफ्फर अहमद भट्ट, मेहराज उद्दीन चोपन, आणि अशफाक अहमद भट्ट यांच्या कलम १२१ अ अन्वये आयपीसीच्या गुन्ह्यासाठी याचिका निकाली काढली.

आशुतोष मसगौंडे

दिल्ली उच्च न्यायालयाने नुकतेच जैश ई मोहम्मद (JeM) या दहशतवादी संघटनेच्या पाच सदस्यांच्या जन्मठेपेची शिक्षा कमी करत ती दहा वर्षांवर आणली. दोषींनी नोव्हेंबर 2022 मध्ये ट्रायल कोर्टाने सुनावलेले जन्मठेपेच्या शिक्षेला त्यांनी आव्हान दिले होते.

न्यायमूर्ती सुरेश कुमार कैत आणि न्यायमूर्ती मनोज जैन यांच्या खंडपीठाने शिक्षेच्या कालावधीत बदल करून पाच अपील निकाली काढले. जन्मठेपेच्या शिक्षेचे दहा वर्षांच्या तुरुंगवासात रुपांतर करण्यात आले.

बिलाल अहमद मीर, सज्जाद अहमद खान, मुझफ्फर अहमद भट्ट, मेहराज उद्दीन चोपन, आणि अशफाक अहमद भट्ट यांच्या कलम १२१ अ अन्वये आयपीसीच्या गुन्ह्यासाठी याचिका निकाली काढली.

याप्रकरणाचा निर्णय देताना उच्च न्यायालयाने रशियन कादंबरीकार फ्योदोर दोस्तोयेव्स्की यांच्या ‘क्राइम अँड पनिशमेंट’ या पुस्तकातील कोटाचा हवाला दिला.

ज्या माणसाला विवेक आहे तो त्याचे पाप कबूल करताना दुःख भोगतो. प्रकरण 19 मध्ये, दोस्तोव्हस्की लिहितात की "जर त्याच्याकडे विवेक असेल तर त्याला त्याच्या चुकीचे भोगावे लागतील; ती शिक्षा आणि तुरुंगवासही असू शकते, असे खंडपीठाने निकालात म्हटले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana: महायुतीला जिंकवणाऱ्या लाडक्या बहिणीचा हप्ता कधी येणार? आता १५०० नाही तर....

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार कोण आघाडीवर?

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलेल्या अथक मेहनतीचा हा विजय

Maharashtra Election 2024: जरांगे फॅक्टर फेल! महाराष्ट्रात महायुतीनं मारली मुसंडी, भाजप रेकॉर्डब्रेक आघाडी

SCROLL FOR NEXT