Rafale fighter aircraft to search Esakal
देश

इंफाळ एअरपोर्टजवळ UFO आढळला! हवाई दलाच्या 2 राफेल जेटकडून शोधमोहीम सुरु

इंफाळ विमानतळाजवळ अज्ञात वस्तू उडत असल्याचे समोर आले होते

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- इंफाळ विमानतळाजवळ अज्ञात वस्तू उडत असल्याचे समोर आले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने Indian Air Force (IAF) शोधमोहीम सुरु केली असून त्यासाठी दोन लढाऊ राफेल एअरक्राफ्ट कामाला लावले आहेत. एएनआयने यासंदर्भातील बातमी दिली आहे.

इंफाळ विमानतळाजवळ काल अडीच वाजण्याच्या सुमारास यूएफओ उडत असल्याचं दिसून आलं होतं. त्यानंतर काही व्यायसायिक विमानांचे उड्डाण रद्द करण्यात आले होते. (The Indian Air Force IAF after receiving information about the sighting of an unidentified flying object UFO near the Imphal airport Rafale fighter aircraft to search)

यूएफओची महिती मिळताच जवळच्या एअरबेसवरुन दोन राफेल एअरक्राफ्ट शोध मोहिमेसाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती संरक्षण विभागाने दिली आहे.

राफेल एअरक्राफ्टमध्ये अत्याधुनिक सेन्सर आहेत. यांनी जवळपासच्या भागात यूएफओचा शोध घेतला. पण, त्यांना तिथे काही आढळले नाही. दोन्ही राफेल एअरक्राफ्ट एकापाठोपाठ पाठवण्यात आले होते. त्यांना काहीही संशयास्पद वस्तू दिसून आलेली नाही, अशी माहिती देण्यात आली आहे.

यूएफओसंबंधी व्हिडिओ आणि फोटो मिळवण्यासाठी सुरक्षा एजेन्सी प्रयत्न करत आहे. तसेच, एअर डिफेन्स मेकॅनिझम सक्रिय करण्यात आले आहे. जेणेकरुन एखादा हल्ला करण्याचा प्रयत्न झालाच तर तो अपयशी करता यावा. पण, अद्याप काही आढळून आलेलं नाही. राफेल फायटर पश्चिम बंगालमध्ये तैनात आहेत. चीनच्या पूर्व सीमेवर वेगवेगळ्या एअर बेसवर यांचे उड्डाण होत असते. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: महायुतीची जोरदार मुसंडी; २०० हून अधिक जागांवर आघाडी

Amit Thackeray Maharashtra Assembly Election : अमित ठाकरे पहिल्यांदाच निवडणुकीत उतरले अन् तिरंगी लढतीच्या चक्रव्यूहात अडकले; ठाकरे ब्रँडचं काय होणार?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: अंधेरी पूर्व विधानसभेत मुर्जी पटेल आघाडीवर

Whatsapp Call Recording : मिनिटांत रेकॉर्ड करा व्हॉट्सॲप कॉल, सोपी स्टेप वाचा एका क्लिकमध्ये..

Margashirsha Amavasya 2024: मार्गशीर्ष अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर करा गंगा स्नान, जाणून घ्या महत्व

SCROLL FOR NEXT