Wearing Hijab Allowed in Exams Education Minister MC Sudhakar esakal
देश

कर्नाटकातील परीक्षा केंद्रात पुन्हा हिजाब बंदी? काँग्रेस सरकारच्या 'या' निर्णयामुळे चर्चेला उधाण

कर्नाटक एक्झॅमिनिशन ऑथेरिटीने (KEA) भरती परीक्षा केंद्रांमध्ये डोके झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या पद्धतींवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे.

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- कर्नाटक एक्झॅमिनिशन ऑथेरिटीने (KEA) भरती परीक्षा केंद्रांमध्ये डोके झाकणाऱ्या सर्व प्रकारच्या पद्धतींवर बंदी आणण्याचा निर्णय घेतला आहे. परिक्षांमध्ये होणारे गैरव्यवहार आणि ब्लुटूथ उपकरणे वापरुने केली जाणारी फसवणूक यावर बंदी आणण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. इंडिया टूडेने यासंदर्भातील माहिती दिली आहे.

डोके झाकणाऱ्या सर्व पद्धतींवर बंदी घातली गेली असली तरी परीक्षा केंद्रामध्ये मंगळसूत्र आणि बोटातील अंगठीला घालून जाण्यास परवानगी देण्यात आली आहे. कर्नाटक एक्झॅमिनिशन ऑथेरिटीने बंदी घातलेल्या वस्तूंमध्ये स्पष्टपणे हिजाबचा उल्लेख केलेला नाही. तरी या निर्णयामुळे हिजाबवर देखील बंदी असेल हे स्पष्ट आहे. (The Karnataka Examination Authority KEA has banned all forms of head cover in recruitment exams for boards and corporations knp94)

राज्यात १८ आणि १९ नोव्हेंबरला बोर्डाच्या परीक्षा होणार आहेत. यापार्श्वभूमीवर प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. प्रशासनाने म्हटलं की, कपडा किंवा टोपीने डोके, तोंड आणि कान झाकणे यावर परीक्षा केंद्रामध्ये बंदी असेल. परीक्षा केंद्रामध्ये होणारे गैरव्यवहार आणि ब्लुटूथ उपकरणांचा वापर फसवणुकासाठी होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

कर्नाटकच्या पब्लिक सर्व्हिस कमिशनच्या परीक्षेदरम्यान काही मुलींना परीक्षा केंद्रात जाण्याआधी मंगळसूत्र काढण्यास सांगितल्याचा प्रकार घडला होता. त्यानंतर या मुद्दयावरुन भाजपने काँग्रेस सरकारवर टीका केली होती. त्यानंतर काँग्रेस सरकारकडून बंदी असलेल्या वस्तूंमधून मंगळसूत्र, झुमके, रिंग अशा वस्तूंना वगळण्यात आल्याचं कळतंय. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: कसबा विधानसभा मतदारसंघात रवींद्र धंगेकर पहिल्या फेरीत आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting:ठाणे पाचपाखाडीमधुन एकनाथ शिंदे आघाडीवरच

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

IND vs AUS: जसप्रीत बुमराहने दिवसाच्या पहिल्याच चेंडूवर घेतली विकेट अन् केला १७ वर्षात कोणाला न जमलेला पराक्रम

SCROLL FOR NEXT