नवी दिल्ली : विद्यापीठ अनुदान आयोगाचे अधिकृत ट्विटर अकाउंट आज रविवारी हॅक झालं आहे. हॅक केल्यानंतर हॅकर्सनी UGC इंडियाच्या ट्विटर हँडलचे प्रोफाईल पिक्चर आणि कव्हर फोटोही बदलला आहे. तसेच हॅकर्सनी अनेकानेक ट्विटर युझर्सना टॅग करत भरपूर ट्विट्स देखील केले आहेत. हॅकर्सने एक ट्विट पीन सुद्धा करुन ठेवलं आहे. (The University Grants Commission)
भारतीय हवामान विभागाचं अकाउंही झालं हॅक
भारतीय हवामान विभागाचं ट्विटर अकाउंट देखील शनिवारी जवळपास दोन तासाहून अधिक काळ हॅकर्सकडून हॅक करण्यात आलं होतं. हॅकर्सने ते हॅक करुन त्यावरुन एनएफटी ट्रेडींग देखील सुरु केलं होतं. त्या अकाउंटवरुन एक ट्विट पिन करुन ठेवण्यात आलं होतं जे एनएफटी ट्रेडींगशी निगडीत होतं. सुरुवातीला त्या अकाउंटचेही प्रोफाईल पिक्चर बदलण्यात आलं होतं, त्यानंतर तेही काढून टाकण्यात आलं. हवामान विभागाला ते पूर्ववत करण्यासाठी जवळपास दोन तासांचा अवधी लागला.
योगी आदित्यनाथांचंही अकाउंट हॅक
याआधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचं अधिकृत ट्विटर हँडल देखील शुक्रवारी रात्री हॅक करण्यात आलं होतं. जवळपास 29 मिनिटे हे ट्विटर हॅकर्सच्या हातात होतं. या दरम्यान हॅकर्सने अनेक ट्विट्स डिलीट केले होते. त्यानंतर काही वेळासाठी अकाउंट सस्पेंड देखील करण्यात आलं होतं. त्यानंतर ते हॅकर्सकडून ताब्यात घेऊन पूर्ववत करण्यात आलं. पुढच्या दिवशी शनिवारी अधिकाऱ्यांनी याबाबतची माहिती दिली. या ट्विटर हँडलला जवळपास 40 लाख लोक फॉलो करतात. (Yogi Adityanath)
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.