Loksabha sakal
देश

Loksabha : सत्ताधाऱ्यांचाही गोंधळ

सकाळ वृत्तसेवा

पश्चिम बंगालच्या कथित विभाजनाच्या मुद्द्यावरून विरोधकांच्या आक्रमकतेमुळे तर, कर्नाटकमधील भ्रष्टाचार प्रकरणात सत्ताधारी भाजपने केलेल्या आरोपांमुळे लोकसभेमध्ये आज गदारोळ झाल्यामुळे लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांना सभागृहाचे कामकाज तहकूब करावे लागले.

कारगिल युद्धात हुतात्मा झालेल्या जवानांना लोकसभेत आदरांजली वाहून लोकसभेच्या कामकाजाला सकाळी अकराला सुरवात झाली. लोकसभाध्यक्ष ओम बिर्ला यांनी जवानांच्या शौर्याची प्रशंसा करताना एक मिनीट मौन पाळून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली आणि प्रश्नोत्तराच्या तासाचे कामकाज सुरू झाले. त्यानंतर तृणमूल कॉंग्रेसचे खासदार कल्याण बॅनर्जी यांनी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर पश्चिम बंगालच्या कथित विभाजनाचा मुद्दा उपस्थित केल्याने गदारोळ झाला. ईशान्य भारतातील राज्यांचा विकास करताना त्यात पश्चिम बंगालमधील उत्तरेकडील भागाचाही विचार केला जावा, अशा आशयाचे आवाहन केंद्रीय मंत्री आणि बंगालमधील नेते सुकांता मुजुमदार यांनी केले होते. तर भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी काल शून्यकाळामध्ये झारखंडमधील धर्मांतराचा मुद्दा मांडताना पश्चिम बंगालमधील मालदा आणि मुर्शिदाबाद बिहार मधील किशनगंज अररिया हा भाग केंद्रशासित प्रदेश करण्याची मागणी केली होती. या दोन्ही वक्तव्यांचा दाखला देत कल्याण बॅनर्जी यांनी पश्चिम बंगालच्या कथित विभाजनाचा विषय उपस्थित करण्याचा प्रयत्न केला. परंतु सुकांत मुजुमदार हे सभागृह बाहेर बोलले असल्याचे आणि निशिकांत दुबे यांचे म्हणणे सभागृहाच्या कामकाजाचा हिस्सा असल्याचे सांगत लोकसभा अध्यक्षांनी कल्याण बॅनर्जी यांना मज्जाव केला. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रमोद काँग्रेसच्या खासदारांनी अध्यक्षांपुढील मोकळ्या जागेत येऊन घोषणाबाजी सुरू केली.

दुसरीकडे भाजपचे कर्नाटक मधील खासदार पी. सी. मोहन यांनी कर्नाटकमधील वाल्मीकी महामंडळातील गैरव्यवहाराचा मुद्दा मांडून मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारला लक्ष्य केले. या गैरव्यवहारामध्ये राज्य सरकारमधील मंत्र्याचा सहभाग असल्याचा देखील त्यांचा आरोप होता.

भाजपची घोषणाबाजी

लोकसभाध्यक्षांनी पी. सी. मोहन यांना देखील बोलण्याची परवानगी नाकारली. त्यामुळे सत्ताधारी बाकांवरील भाजप खासदारांनी कॉंग्रेस व कर्नाटक सरकारविरुद्ध घोषणाबाजी आरंभली. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी माजी मंत्री व खासदार अनुराग ठाकूर हे देखील या घोषणाबाजीत सहभागी झाले होते. विरोधी बाकांवरील तृणमूल कॉंग्रेस आणि सत्ताधारी बाकांवरील भाजप खासदारांचा गोंधळ यामुळे सभागृहाचे कामकाज चालवणे अशक्य झाल्याने बिर्ला यांनी साडेबारापर्यंत कामकाज तहकूब करण्याचा निर्णय घेतला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: कोणते 'पवार' जिंकणार? महाराष्ट्र पाहणार आणखी एका काका पुतण्याची लढाई? जाणून घ्या बारामतीची परिस्थिती

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Rohit Sharma: 'एखादा दिवस वाईट असू शकतो, तुमचाही ऑफिसमध्ये...', कॅच सुटण्यावर स्पष्टीकरण देताना रोहितने ठेवलं वर्मावर बोट

Shubh Muhurat For Shopping 2024: घर किंवा दुकान खरेदी करण्यापूर्वी 'या' गोष्टी ठेवा लक्षात, वाचा एका क्लिकवर खरेदीचा शुभ मुहूर्त

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

SCROLL FOR NEXT