K. C. Venugopal sakal
देश

K. C. Venugopal : महाराष्ट्रातील जनता भ्रष्ट सरकारला खेचेल;के. सी. वेणुगोपाल

‘‘राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला.

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : ‘‘राज्यातील महाभ्रष्ट महायुती सरकार सत्तेतून बाहेर काढणे हा काँग्रेस पक्षाचा संकल्प आहे. भारतीय जनता पक्षाने लोकसभा व विधानसभा पोटनिवडणुकीतही सरकारी यंत्रणांचा मोठ्या प्रमाणात गैरवापर केला. पण तरीही त्यांचा पराभव झाला. महाराष्ट्रातील स्वाभिमानी जनता ही राज्यातील भ्रष्ट आणि असंवैधानिक सरकारला सत्तेवरून खाली खेचून परिवर्तन करणार आहे,’’ असा विश्वास काँग्रेस कमिटीचे संघटन सरचिटणीस के.सी. वेणुगोपाल यांनी व्यक्त केला.

काँग्रेस पक्षाच्या प्रमुख नेत्यांची बैठक आज मुंबई येथील गरवारे क्लबमध्ये झाली. यावेळी ते बोलत होते. पक्षाचे राज्य प्रभारी रमेश चेन्निथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यावेळी उपस्थित होते.

विधिमंडळ काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री सर्वश्री सुशीलकुमार शिंदे व पृथ्वीराज चव्हाण, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक,अविनाश पांडे, गोव्याचे प्रभारी माणिकराव ठाकरे, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड, विधान परिषदेतील गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, त्याचबरोबर नव्याने निवडून आलेले खासदार, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आदी उपस्थित होते.

‘‘विधानसभा निवडणुकीला ताकदीने सामोरे जाण्यासाठी महाविकास आघाडी विधानसभेच्या निवडणुका एकत्र लढणार असून तीन पक्ष एकत्र बसून जागावाटपाची चर्चा करणार असल्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला. विधान परिषद निवडणुकीत पक्षाच्या ज्या आमदारांनी क्रॉस व्होटिंग केले त्यांच्यावर पक्षाने कारवाई केली असून काही दिवसांत आपल्याला त्याची माहिती मिळेल. पक्षात बेशिस्त खपवून घेतली जाणार नाही, असे के. सी. वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्राला गुलाम होऊ देणार नाहीः पटोले

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही विधानसभा तयारीसंदर्भात झालेल्या चर्चेविषयी माहिती यावेळी दिली. ‘‘काँग्रेस पक्ष संविधान, लोकशाही व महाराष्ट्राच्या स्वाभिमानाच्या रक्षणाची लढाई करणार आहे. आम्ही महाराष्ट्राला गुजरातचा गुलाम होऊ देणार नाही. महाराष्ट्राची संपत्ती आणि मुंबई गुजरातला विकू देणार नाही.

२० ऑगस्ट रोजी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाणार असून काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खा.मल्लिकार्जून खर्गे, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे उपस्थित राहणार असून याचवेळी विधानसभेच्या प्रचाराचा नारळ फोडणार असल्याची माहिती पटोले यांनी यावेळी दिली. आगामी राज्य विधानसभा निवडणुकीतही लोकसभा निवडणुकीप्रमाणेच महाविकास आघाडी आपली कामगिरी करेल. तिन्ही पक्ष जागावाटपासंदर्भात एकत्र चर्चा करतील. जागा वाटप ते प्रचार अशा सर्व पातळ्यांवर आम्ही एकत्रितपणे लोकांच्या समोर जाणार आहोत, असा विश्वासही कॉँग्रेसच्या नेत्यांनी या पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik : 'या मुन्नाचा भांगसुद्धा कोणी वाकडा करू शकत नाही'; खासदार महाडिकांचा उद्धव ठाकरेंना सणसणीत टोला

Latest Maharashtra News Updates : राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार नवाब मलिक आणि सना मलिक यांच्या बाईक रॅलीला सुरूवात

मृणाल दुसानिस झाली बिसनेसवूमन! ठाण्यात 'या' ठिकाणी सुरू केलं नवं हॉटेल; पाहा आतून कसं आहे अभिनेत्रीचं 'बेली लाफ्स'

सावधान! व्हॉट्सॲपवर लग्नाची आमंत्रण पत्रिका येताच क्लिक करू नका, नाहीतर होईल मोठी फसवणूक, वाचा 'या' नव्या स्कॅमबद्दल

जिगर लागतो...! खांद्याला दुखापत, तरीही ऑस्ट्रेलियन खेळाडूने संघासाठी एका हाताने केली फलंदाजी

SCROLL FOR NEXT