नवी दिल्ली : हिंदुत्ववाद्यांसाठी वंदनीय असलेले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्यावरुन सध्या रणकंदन माजलंय. याला निमित्त ठरलंय ते म्हणजे गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी केलेलं वक्तव्य... महात्मा गांधी यांच्याच सूचनेवरून अंदमानच्या तुरुंगात काळ्या पाण्याची शिक्षा भोगताना ब्रिटीशांकडे दया याचिका दाखल केली होती, असं वादग्रस्त वक्तव्य देशाचे राजनाथ सिंह यांनी केलं आहे. स्वातंत्र्य लढ्यातील सावरकरांचे योगदान काही ठराविक विचारसरणीच्या लोकांनी बदनाम केलं असून ते आता सहन केलं जाणार नसल्याचं प्रतिपादन त्यांनी केलंय. यावर आता एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
ओवैसी यांनी म्हटलंय की, ते विकृत केलेला इतिहास लोकांसमोर मांडत आहेत. हे जर असंच सुरु राहिलं तर ते महात्मा गांधींना हटवून सावरकरांना राष्ट्रपिता ठरवतील, जे महात्मा गांधींच्या खूनामधले आरोपी होते आणि ज्यांच्यावर जस्टीस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीमध्ये दोषी ठरवण्यात आलं होतं.
'वीर सावरकर: द मॅन हू कॅन प्रिव्हेंट पार्टिशन' या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभावेळी राजनाथ सिंह यांनी हे वक्तव्य केलंय. उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांनी लिहिलेलं हे पुस्तक रूपा पब्लिकेशन्सने प्रकाशित केलं असून आंबेडकर इंटरनॅशनल सेंटरमध्ये या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.
राजनाथ सिंह यांनी म्हटलंय की, सावरकरांच्या विरोधात खूप खोटं पसरवलं गेलं आहे. वारंवार हे सांगितलं गेलंय की, त्यांनी इंग्रजांसमोर अनेकदा क्षमायाचना करत मर्सी पिटीशन्स दाखल केल्या. मात्र वास्तव हे आहे की, या मर्सी पिटीशन्स त्यांनी स्वत:च्या सुटकेसाठी दाखल केलेल्या नव्हत्या. सामान्यत:च एखाद्या कैदीला असा अधिकार असतो की, त्याची इच्छा असेल तर तो मर्सी पिटीशन दाखल करु शकतो. महात्मा गांधींनीच त्यांना सांगितलं होतं की तुम्ही मर्सी पिटीशन्स दाखल करा. त्यांच्या सांगण्यावरुनच सावरकरांकडून या पिटीशन्स दाखल करण्यात आल्या. गांधीनी असं म्हटलं होतं की, ज्या प्रकारे आम्ही शांततेने स्वातंत्र्याची चळवळ चालवत आहोत, सावरकर तेच करतील, असं राजनाथ सिंह म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.