भारतातील हजारो लोकांचे नाव, मोबाईल नंबर, पत्ता आणि कोविड टेस्ट निकाल यासह त्यांचा वैयक्तिक डेटा (Personal Data Leak) सरकारी सर्व्हरवरून लीक झाला आहे. ही माहिती ऑनलाइन सर्चद्वारे मिळवता येत आहे. इतकेच नाही तर हा लीक झालेला डेटा रेड फोरम (Raid Forums) च्या वेबसाइटवर विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे, तसेच सायबर गुन्हेगाराकडून तब्बव 20,000 हून अधिक लोकांचा वैयक्तिक डेटा त्याच्याकडे असल्याचा दावा केला आहे. रेड फोरमवर टाकलेल्या डेटामध्ये या लोकांचे नाव, वय, लिंग, मोबाइल नंबर, पत्ता, तारीख आणि कोविड-19 रिपोर्ट दाखवण्यात आली आहे.
सायबर सुरक्षा संशोधक राजशेखर राजहरिया यांनीही ट्विट केले आहे की, वैयक्तिक ओळख पटण्याइतकी माहिती (PII) ज्यामध्ये नाव आणि COVID-19 टेस्टचा रिझल्ट CDN द्वारे सार्वजनिक केले गेले गेले आहेत . ते म्हणाले की Google ने प्रभावित सिस्टममधील लाखो लोकांची माहिती इंडेक्स केली आहे. Personal Identifiable Information मध्ये COVID-19, MOB, PAN, पत्ता, RTPCR निकाल आणि कोविन डेटा नाव दिलेला असतो आणि हे सर्व सरकारी CDN माध्यमातून सार्वजनिक केले जात आहेत. Google ने सुमारे 9 लाख सार्वजनिक/खाजगी सरकारी डॉक्युमेंट्स सर्च इंजिनमध्ये टाकले आहेत.
या संदर्भात इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी मंत्रालयाला पाठवलेल्या ईमेल क्वेरीला कोणतेही ही उत्तर देण्यात आलेले नाही. रेड फोरमवर सार्वजनिक केलेला सॅम्पल डॉक्युमेंट्सवरुन असे दिसून आले की, लीक झालेला डेटा कोविन पोर्टलवर अपलोड करायचा होता. कोरोना साथीबाबत आणि लसीकरण कार्यक्रमाविषयी जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने सरकार डिजिटल तंत्रज्ञानावर खूप मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. अनेक सरकारी विभाग लोकांना कोरोना संबंधित सेवा आणि माहितीसाठी आरोग्य सेतू अॅप वापरण्यास भाग पाडत आहेत. या दरम्यान डेटा लिक होणे ही गंभीर बाब आहे.
राजहरिया यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ते या डेटा लीकमुळे कोणत्याही असुरक्षितेची तक्रार करत नाहीत परंतु, लोकांना फसवणूक करणारे कॉल, कोरोनाशी संबंधित ऑफर इत्यादींपासून सावध राहण्याचा इशार देतात. कारण त्यांचा डेटा विकला जात असून डार्क वेबमध्ये विकल्या जाणार्या डेटाचा सायबर गुन्हेगार आणि फसवणूक करणारे अनेकदा विविध प्रकारच्या फसवणुकीसाठी करतात.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.