Aadhaar Card: आधार कार्ड हा भारतातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा दस्तऐवज आहे. आधार कार्ड शिवाय बहुतांश सरकारी योजनांचा लाभ घेता येणार नाही. यासोबतच सरकारी नोकरीसाठी अर्ज करण्यासाठीही आधार कार्ड आवश्यक आहे.
ज्या लोकांनी 10 वर्षांपूर्वी आधार कार्ड बनवले होते त्यांना आता ते अपडेट करण्यास सांगितले जात आहे. जून महिन्यात आधार कार्डशी संबंधित अशी अनेक कामे आहेत, ती पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
त्याचवेळी, कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPFO) शी आधार आणि पॅन कार्ड लिंक करणे अनिवार्य करण्यात आले आहे.
पॅन-आधार लिंक करण्याची शेवटची तारीख:
अनेक दिवसांपासून पॅन आणि आधार लिंक करण्यास सांगितले जात आहे. जर पॅन-आधार कार्ड लिंक नसेल तर पॅन कार्ड निष्क्रिय केले जाऊ शकते. PAN शी आधार लिंक करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे.
पॅन कार्डशी संबंधित अनेक कामे आहेत. बँकिंगचे काम पॅनकार्डशिवाय करता येत नाही. अशा परिस्थितीत पॅन-आधार लिंक न केल्यास ग्राहकांना अनेक समस्यांना सामोरे जाऊ लागू शकते. पॅन कार्ड निष्क्रिय केल्याने अनेक बँकिंग कामकाजात अडथळा येऊ शकतो.
आधार कार्डमध्ये लोकांचे नाव, पत्ता, फोटो, बायोमेट्रिक डेटा अशी महत्त्वाची माहिती असते. डिजिटल इंडिया अंतर्गत 14 जूनपर्यंत आधार अपडेट करण्याची सुविधा मोफत देण्यात आली आहे.
UIDAI नुसार, myAadhaar पोर्टलवर ही सेवा मोफत आहे. दिलेल्या तारखेपर्यंत आधार अपडेट न केल्यास ते अपडेट करण्यासाठी शुल्क आकारले जाईल. पोर्टलवर फक्त नाव, लिंग, जन्मतारीख मोफत अपडेट केली जाईल, असेही UIDAI कडून स्पष्ट करण्यात आले.
भविष्य निर्वाह निधी (EPFO) आणि आधार लिंक:
1 जूनपासून कर्मचारी भविष्य निर्वाह निधीच्या नियमात बदल करण्यात आला आहे. आता पीएफ खातेधारकांना त्यांच्या खात्यात आधार कार्ड लिंक करावे लागणार आहे.
कर्मचारी पेन्शन योजना (EPS) मधून जास्त पेन्शन घेण्यासाठी EPFO ने अर्जाची मर्यादा 26 जून 2023 पर्यंत वाढवली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.