कोलकाता : पश्चिम बंगालमधील हल्दिया (massive fire at indian oil campus in kolkata) येथील इंडियन ऑइल कॅम्पसमध्ये (Indian oil Campus haldia) मंगळवारी दुपारी लागलेल्या आगीत 3 जणांचा मृत्यू झाला, तर 50 जण जखमी झाले. घटनास्थळी आग्निशमन दलाच्या जवानांना अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हल्दिया येथील इंडियन ऑईल कॉर्पोरेशन (Haldia India Oil Plant) प्लांटला लागलेल्या आगीत जखमी झालेल्यांना इंडियन ऑइल कॉर्पोरेशन हॉस्पिटल आणि कोलकाता पोर्ट ट्रस्ट हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज इंडियल ऑईल कॉर्पोरेशनच्या कंपनी कॅम्पसमध्ये एका मॉक ड्रिलचे (mock drill) आयोजन करण्यात आले होते. मॉक ड्रिलनंतर एका प्लांटमध्ये शट डाऊनचे काम सुरू होते त्यावेळी अचानक ड्रिलिंगदरम्यान स्फोट (Blast During Drilling ) झाला. यात तिघा जणांचा होरपळून मृत्यू झाला तर 50 जण जखमी झाल्याचे सांगितले जात आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.