POlice Sakal
देश

सावरकरांचे पोस्टर काढण्याचा प्रयत्न; कर्नाटकातील शहरात 144 लागू

टिपू सुलतान समर्थकांनी हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

बंगळूर : कर्नाटकमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या महोत्सवावर टिपू सुलतान आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पोस्टरवरून वाद झाल्याचं समोर आलं आहे. संपूर्ण देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना कर्नाटकमधील शिवामोग्गा या शहरात या वादामुळे पोलिसांकडून कलम १४४ लागू करण्यात आला आहे.

कर्नाटकमधील काही लोकांकडून सावरकरांचे पोस्टर काढून टाकण्याचा प्रयत्न केला जात होता. सावरकरांच्या पोस्टरच्या जागी टिपू सुलतानचे पोस्टर लावण्याचा या लोकांचा प्रयत्न होता. शहरातील अमीर अहमद चौकात ही घटना घडली असून यामुळे तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान पोलिसांकडून खबरदारी घेत जमावबंदी लागू करण्यात आली आहे. हा वाद शांत होण्यासाठी पोलिसांनी काही वेळ लाठीचार्जही केला आहे. त्यामुळे परिस्थिती आटोक्यात आली आहे.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सव साजरा करण्यासाठी 'हर घर तिरंगा' ही योजना लागू केली. त्यानंतर एमआयएमचे अध्यक्ष ओवैसी यांनी भारताच्या स्वातंत्र्यात टिपू सुलतान यांचे योगदान विसरता येणार नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर आता हा वाद पेटला आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US Elections Updates: डोनाल्ड ट्रम्प यांची विजयाच्या दिशेने वाटचाल तर कमला हॅरिस स्लो मोशनमध्ये, सुरुवातीचे निकाल काय सांगतात?

BJP Rebel Candidates: बंडखोरीचा कलह, महायुतीतील 40 जणांवर भाजपची कठोर कारवाई! श्रीकांत भारतीयांच्या भावाचा समावेश

Wedding Dates : तुलसी विवाहानंतर येणाऱ्या वर्षात ‘शुभमंगल सावधान’ साठी आहेत इतकेच मुहूर्त

Latest Marathi News Updates : 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह'प्रकरणी सुप्रीम कोर्टात आज सुनावणी

सोलापूर शहरातून 3 ठिकाणाहून 10 लाखांची रोकड जप्त! दोघे पायी तर एकजण दुचाकीवरून रोकड घेवून जात होता; फौजदार चावडी, सदर बझार पोलिसांची कारवाई

SCROLL FOR NEXT