Tirupati Devasthanam: तिरुपती बालाजी देवस्थानच्या लाडू प्रसादासाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी वापरण्यात आल्याचं आता स्पष्ट झालं आहे. NDDB CALF लॅब अर्थात राष्ट्रीय दुग्धविकास मंडळाने सादर केलेल्या अहवालात परदेशी चरबी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे.
लाडूंसाठी वापरण्यात आलेल्या तुपामध्ये परदेशी चरबी, गोमांस चरबी, माशांचे तेल आणि लार्ड (डुकराची चरबी) असल्याचं रिपोर्टमधून समोर आलं आहे. बुधवारी आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी याबाब गंभीर आरोप केले होते. चंद्रबाबू नायडू यांनी वायएसआर काँग्रेसवर तिरुपती लाडूंमध्ये जनावरांच्या चरबीचा वापर केल्याचा आरोप केला होता. नायडू यांचा हा आरोप अपप्रचार आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचं YSR काँग्रेसने म्हटलं होतं.
भाजपचे राष्ट्रीय नेते विनोद तावडे यांनी याबाबत ट्वीट करुन पुरावादेखील दिला आहे. तावडे म्हणतात, तिरुपती देवस्थानच्या पवित्र लाडूंमध्ये बीफ फॅट आणि माशांचं तेल आढळून आलेलं आहे. हिंदू धर्माची आस्था आणि विश्वासाला हा तडा आहे. वायएसआरसीपी सरकार किती हिंदूविरोधी होतं, हे आता उघड झालं आहे. जगन मोहन रेड्डी सरकारने कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेची थट्टा केली आहे. त्यांना माफ केलं जाऊ शकत नाही.
आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांच्या कार्यकाळात तिरुपती बालाजीच्या प्रसादामध्ये प्राण्यांचे मांस मिसळले जात होते, असा गंभीर आरोप आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलुगू देसम पक्षाचे (टीडीपी) प्रमुख एन. चंद्राबाबू नायडू यांनी बुधवारी केला. राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या (एनडीए) विधिमंडळ सदस्यांच्या बैठकीमध्ये बोलताना नायडू यांनी हा आरोप केला आहे. ‘‘वायएसआर काँग्रेसच्या सरकारने व्यंकटेश्वर मंदिरालाही सोडले नाही. येथे देण्यात येणाऱ्या प्रसादामध्ये प्राण्यांचे मांस वापरले जात होते. हा अत्यंत निंद्य प्रकार आहे,’’ असे नायडू म्हणाले.
नायडू यांनी केलेला आरोप जगनमोहन यांनी फेटाळला आहे. मी माझ्या कुटुंबाची शपथ घेऊन सांगण्यास तयार आहे की, लाडूमध्ये मांसाचा अंश नाही. चंद्राबाबू यांनी जे आरोप केले आहेत ते सत्य आहेत असे ते त्यांच्या कुटुंबीयांची शपथ घेऊन सांगू शकतील का असे आव्हान रेड्डी यांनी दिले आहे.
नायडू यांनी केलेले आरोप वायएसआर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बी. करुणाकर रेड्डी यांनी गुरुवारी फेटाळून लावत केवळ राजकीय स्वार्थासाठी नायडू यांच्याकडून असे आरोप करण्यात येत असल्याचा दावा केला आहे. रेड्डी यांनी दोनदा तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्षपद भूषविले आहे. ‘‘राजकीय स्वार्थ साधण्यासाठी थेट भगवान व्यंकटेशाच्या प्रसादाबद्दल अशा पद्धतीने आरोप करणे निंदनीय आहे,’’ असे रेड्डी म्हणाले. लाडूमध्ये मांस मिसळणे शक्य आहे का? असा सवालही त्यांनी केला आहे.
टीडीपी पुरावे सादर
वायएस जगनमोहन रेड्डी यांनी नायडू यांचे आरोप फेटाळल्यानंतर ‘टीडीपी’कडून गुरुवारी लाडूच्या नमुन्याचा प्रयोगशाळेतील चाचणीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. हा अहवाल जुलै महिन्यातील असून यानुसार लाडू बनविण्यासाठी वापरण्यात आलेल्या तुपात माशाचे तेल, गोमांसातील स्निग्ध पदार्थ आणि डुक्कराच्या चरबीतील स्निग्ध पदार्थ आढळला आहे. हा अहवाल राष्ट्रीय डेअरी विकास महामंडळाच्या गुजरात येथील प्रयोग शाळेतील तपासणीचा हा अहवाल आहे. तृणमूल काँग्रेसचे प्रवक्ते अनाम वेंकटरमणा रेड्डी यांनी पत्रकार परिषद घेऊन हा अहवाल प्रसिद्ध केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.