ramdas boat Titanic Tourist Submarine esakal
देश

Titanic Tourist Submarine : 'प्रेतं तरंगल्याने लागला पत्ता...' टायटनने जागवल्या ७६ वर्ष जुन्या रामदास बोटीच्या आठवणी

७४२ जणांना घेऊन जाणारी रामदास बोट वादळात सापडून बुडाली.

धनश्री भावसार-बगाडे

Titanic Tourist Submarine And Ramdas Boat : रविवारी टायटॅनिक च्या अवशेषांना भेट देण्यासाठी गेलेल्या पाणबुडीचा “भयंकर स्फोट ” झाला, ज्यात जहाजावरील सर्वांचा मृत्यू झाल्याचं तपासात समोर आलं. या घटनेशी साधर्म्य साधारणारी अशीच एक दुर्दैवी घटना जुलै १९४७ मध्ये घडली होती. ७४२ जणांना घेऊन जाणारी रामदास बोट वादळात सापडून बुडाली.

टायटन सबमरीन घटना

ओशियन गेट या पर्यटन कंपनीच्या एका छोट्या पाणबुडीमधून पाच अब्जाधीश टायटॅनिक जहाजाचे अवशेष पाहायला गेले होते. रविवारी टायटन या सबमरीन मधून हे अटलांटिक महासागराच्या तळाशी जात होते. मात्र, काही तांत्रिक बिघाडामुळे या पाणबुडीचा आणि त्यासह त्यातील सर्वांचा संपर्क तुटला. यानंतर बेपत्ता झालेल्या या सर्वांचा शोध सुरू करण्यात आला होता. दुर्दैवाने ओशियन गेटने या पाणबुडी मधले सर्व प्रवासी मृत्युमुखी पडले आहेत असे आपल्या अधिकृत स्टेटमेंट मध्ये जाहीर केले. यात अब्जाधिश प्रवासी प्रवास करत होते.

रामदास बोट घटना

रामदास बोटीचा अपघात हा मुंबईकरांसाठी, वाचलेल्या प्रवाशांसाठी आजही थरकाप भरवणारी आणि हृदय पिळवटून टाकणारी घटना आहे.

बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीच्या ७४२ जणांच्या प्रवासी बोटीला १९४७ मध्ये मोठा अपघात झाली. ही बोट वादळात सापडूव बेपत्ता झाली होती. यात ७४२ प्रवाशांपैकी केवळ ७४ प्रवासी बचावले.

या घटनेचे त्यावेळी मोठ्या प्रमाणात राजकीय आणि सामाजिक पडसाद उमटल्याचे त्यावेळी छापून आलेल्या वृत्तांतून समोर येते. या घटनेमुळे मुंबईत आणि विशेषतः बॉम्बे स्टीम नॅव्हिगेशन कंपनीत मोठी खिन्नता पसरली होती.

बोटीतील प्रवाशांच्या नातेवाईकांनी कंपनीचे ठाकूरद्वार आणि भाऊधक्क्याला गराडा घातला होता. रेस्क्यु ऑपरेशन नंतर सापडलेल्या जिवंत लोकांची यादी समजल्याने त्यानंतर बराच काळ नातेवाईक साश्रू नयनांनी कार्यालयात आपले कोणी सापडले का, याची चौकशी करत होते.

प्रेतं तरंगल्याने लागला पत्ता

बोट वेळेत न परतल्याने बंदरावर सगळे जण चिंतेतच होते. तोच ससून डॉकजवळ ४ प्रेतं तरंगत असल्याचा फोन आला. मासेमाऱ्यांना ही प्रेतं आढळली होती. मग बंदरावर प्रसंगाचं गांभीर्य लक्षात आल्याने धावपळ सुरू झाली.

दुसरी बोट पाठवण्यात आली. तीने समुद्रात तरंगणारे ८ प्रवासी वाचवून आणले. पण या वाचवलेल्या प्रवाशांसाठी या प्रसंगाने मोठा धक्का बसला. काहींचे संपूर्ण आयुष्यभराची कमाई, कुटुंबच या संपले तो एकटा व्यक्ती वाचला.

काहींनी डोळ्यासमोर बहिणीला, मुलाला, कुटुंबाला वाहून जाताना पाहिले. या वाचलेल्या लोकांमध्ये एक १२ वर्षांचा मुलगा होता, तो समुद्रात तरंगत होता.

या आधीही झाल्या होत्या अशा घटना

रामदास बोटीची घटना त्याकाळातील सर्वात मोठी घटना होती. त्यापूर्वी साधारण २० वर्षे आधी तुकाराम व जयंती या बोटींचा असा मोठा अपघात झाला होता, असे त्यावेळच्या वृत्तांमधून समजते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: “....परत म्हणू नका दादा तुम्ही बोललाच नाहीत”; अजित पवारांचं सांगता सभेत भावनिक आवाहन

Latest Maharashtra News Updates : ७५ पेक्षा जास्त सभा घेतल्या, सरकारनं केलेली कामं लोकांसमोर मांडत गेलो; मुख्यमंत्र्यांनी सांगितला प्रचाराचा लेखाजोखा

IND vs AUS: 'रोहितच्या जागेवर असतो, तर मी पण...', ऑस्ट्रेलियाच्या हेडचं हिटमॅनच्या सुट्टीवर भाष्य

AUS vs PAK : पँट सांभाळू की चौकार ...? संकटात सापडला पाकिस्तानचा खेळाडू, Video Viral

Ajit Pawar: अजित पवारांच्या सभेत मुलगी हरवली; दादांनी स्वतः दिला आवाज अन् मुलगी पुढे आली

SCROLL FOR NEXT