TMC to send journalist Sagarika Ghose Nadimul Haq to rajya sabha from West Bengal for upcoming elections political News  
देश

Sagarika Ghose On Rajya Sabha : राजकारणात जाणार नाही म्हणाणाऱ्या सागरिका घोष तृणमूलमध्ये; राज्यसभेचं मिळालं तिकीट

बंगालमधून राज्यसभेच्या पाच जागा यंदा रिक्त झाल्या आहेत. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे ‘तृणमूल’ चार आणि भाजप एका उमेदवार राज्यसभेसाठी देऊ शकते.

श्‍यामल रॉय

कोलकता : तृणमूल काँग्रेसने राज्यसभा निवडणुकीसाठी चार उमेदवारांपैकी तीन महिलांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे यामध्ये दिल्लीतील बंगाली पत्रकार सागरिका घोष यांचा समावेश आहे. (Sagarika Ghose On Rajya Sabha)

‘तृणमूल’च्या चार राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ यंदा समाप्त झाला. त्यापैकी नदिमुल हक यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. पक्षाच्या माजी आमदार सुश्‍मिता देव आणि ममताबाला ठाकूर यांच्यासह सागरिका घोष यांना उमेदवारी मिळाली आहे. डॉ. शंतनू सेन, सुभाषिश चक्रवर्ती आणि अबीर विश्‍वास या यंदा निवृत्त झालेल्या खासदारांना पुन्हा संधी दिलेली नाही. ठाकूर या पश्‍चिम बंगालमधील मतुआ समाजातील आहे.

बंगालमधून राज्यसभेच्या पाच जागा यंदा रिक्त झाल्या आहेत. विधानसभेतील संख्याबळाच्या आधारे ‘तृणमूल’ चार आणि भाजप एका उमेदवार राज्यसभेसाठी देऊ शकते. भाजपने आमदार समीक भट्टाचार्य यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या उमेदवारीचे राज्यातील भाजपने स्वागत केले आहे. भाजपने गेल्या वेळी अनंत महाराज यांना गेल्या वेळी उमेदवारी दिली होती.

सागरिका यांच्या उमेदवारीचे आश्‍चर्य

पत्रकार सागरिका घोष यांच्या उमेदवारीने ‘तृणमूल’ आणि अन्य पक्षांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. कोणत्याही राजकीय पक्षाकडून राज्यसभेचे तिकीट स्वीकारणार नाही, अशी पोस्ट सागरिका यांनी काही वर्षांपूर्वी ट्विटरवर केली होती. पण आता त्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. राज्यसभेत प्रतिनिधित्व करण्यासाठी ममताबाला ठाकूर यांच्याप्रमाणे सक्षम उमेदवाराच्या शोधात आम्ही होतो आणि सागरिका घोष यांची निवड योग्य आहे, अशी प्रतिक्रिया तृणमूल काँग्रेसच्या एका नेत्याने दिली.

सागरिका घोष यांनी अनेक मुद्द्यांवर घेतलेल्या भूमिकेने समाजाला प्रेरणा मिळाली आहे.

डेरेक ओब्रायन, खासदार, तृणमूल काँग्रेस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT