Tikait_Modi 
देश

"आपण बचावलो" असं मोदींनी सांगणं म्हणजेच स्टंटबाजी - राकेश टिकैत

अशा प्रकारच्या बातम्या चालवणं हा समानुभूती मिळवण्याचा प्रकार

Amit Ujagare (अमित उजागरे)

नवी दिल्ली : पंजाबच्या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांचा ताफा अडवण्यात आल्यानं सध्या देशभरात मोठा गदारोळ सुरु आहे. यावर आता भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत (Rakesh Tikait) यांनी भाष्य केलं आहे. मोदींचा हा स्टंट असल्याचं सांगताना सहानुभूती मिळवण्याचा प्रकार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. (To say by PM Modi I saved in Punjab is a stunt says Rakesh Tikait)

टिकैत म्हणाले, "पंतप्रधान जेव्हा पंजाबला आले तेव्हा त्यांच्या सुरक्षेसाठी कशा प्रकारे तयारी करण्यात आली. पण पंतप्रधानांनी स्वतः असं म्हणणं की, मी बचावलो. यावरुन हे स्पष्ट होतं की, हा त्यांचा स्टंट होता. लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी वापरलेला हा खालच्या दर्जाचा मार्ग आहे"

केंद्र सरकारनं याप्रकरणी म्हटलंय की, मोदींच्या दौऱ्यामध्ये सुरक्षेमध्ये त्रुटी होत्या. तर पंजाब सरकारचं म्हणणं आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी सभेच्या ठिकाणी गेले नाहीत कारण तिथं अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या. दोन्ही सरकारं आपला बचाव करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळं पंतप्रधानांनी त्या ठिकाणी जायलाच नको होतं, असंही टिकैत यांनी म्हटलं आहे.

पंजाबमधील दौऱ्यात नक्की काय घडलं होतं?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बुधवारी पंजाबमधील फिरोजपूर येथे सभा आयोजित करण्यात आली होती. मात्र, सुरक्षा यंत्रणेतील त्रुटींमुळे ही सभा ऐनवेळी रद्द करण्यात आली. कार्यक्रमस्थळी जाणाऱ्या पंतप्रधानांचा ताफा एका फ्लायओव्हरवर सुमारे 15 ते 20 मिनिटे अडकून पडला होता. सुरक्षेच्या कारणस्तव पंतप्रधान मोदींना पुन्हा भटिंडा विमानतळावर नेण्याचा निर्णय घेण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rajesh Kshirsagar Won Kolhapur North Assembly Election : 'कोल्हापूर उत्तर'मधून राजेश क्षीरसागर तब्बल 30 हजार मतांनी विजयी; लाटकरांचा केला पराभव

karmala Assembly Election 2024 Result Live: करमाळ्यात नारायण आबा पाटील यांचा विजय, संजयमामा शिंदे यांना धोबीपछाड, बागल गटाचे अस्तित्व धोक्यात

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: राज ठाकरेंना मोठा धक्का, अमित ठाकरे पडले

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मोहोळमध्ये राजू खरे 29528 मतांनी आघाडीवर

Jaykumar Gore won Man Assembly Election 2024 Result: जयाभाऊचा विजयाचा चाैकार! माण-खटावमध्ये प्रभाकर घार्गे यांचा माेठा पराभव

SCROLL FOR NEXT