देशाच्या संसदेच्या उद्घाटन सोहळ्यावर बहिष्कार टाकल्यानंतर विरोधी राजकीय पक्षांनी नीती आयोगाच्या बैठकीतही सरकारला विरोध केला आहे. आज (२७ मे) रोजी होणाऱ्या या नीती आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री नितीश कुमार, ममता बॅनर्जी, अरविंद केजरीवाल, भगवंत मान , तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन आणि केसीआर यांनी बहिष्कार टाकला आहे. नीती आयोगाची बैठक दिल्लीत आज होणार आहे. या बैठकीसाठी सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्र शासित प्रदेशाचे राज्यपाल सहभागी होणार आहेत.
केंद्र आणि दिल्ली सरकारमधील संघर्षामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांनी आदी नेत्यांनी या बैठकीवर बहिष्कार टाकला आहे. सकाळी 9.30 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रगती मैदानात ही बैठक होणार आहे. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देखील या बैठकीत सामिल होण्यासाठी दिल्लीत रात्री उशीरा दाखल झालेत.
निती आयोगाच्या या आजच्या बैठकीचा अजेंडा पुढील 25 वर्षांत म्हणजे 2047 सालापर्यंत भारत कसा असणार हा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी ९.३० वाजता या बैठकीचे उद्घाटन करणार आहेत. मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. सर्व राज्यांचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर या बैठकीत सहभागी होणार आहेत.
एमएसएमई, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, महिला सक्षमीकरण, आरोग्य आणि , कौशल्य विकास आणि सामाजिक पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा या बैठकीत आठ प्रमुख विषयांवर आज चर्चा होणार आहे.
कोणत्या राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार?
देशातील प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेसचे चार राज्यांचे मुख्यमंत्री या बैठकीत सहभागी होणार आहेत. त्याचबरोबर या बैठकीत भाजप आणि त्यांचे सर्व मित्रपक्ष आणि समविचारी पक्ष सहभागी होण्याची शक्यता आहे. आम आदमी पक्षासह इतर विरोधी पक्षांच्या बहिष्काराच्या घोषणेवर भाजप नेत्यांचे काय म्हंटलं आहे याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.